खासदारांच्या पुढाकाराने ४६११ गुंठेवारीची प्रकरणे मनपा प्रशासकांच्या स्वाधीन

खासदारांच्या पुढाकाराने ४६११ गुंठेवारीची प्रकरणे मनपा प्रशासकांच्या स्वाधीन

प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी मालमत्ता नियमितीकरणाचे नगर रचना विभागाला दिले आदेश

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात व मागदर्शनाखाली एमआयएम पक्षाच्या वतीने आज औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत मागील ३० ते ४० वर्षात विकसित झालेल्या वसाहतीतील व इतर वसाहतीतील एकूण ४६११ मालमत्ता धारकांनी त्यांच्या ताब्यातील मालमत्तांना गुंठेवारी कायदा अंतर्गत नियमितीकरण करणेस्तव एमआयएम पक्षातर्फे आयोजित गुंठेवारी कॅम्प मध्ये जमा केलेल्या कागदपत्रांना महानगरपालिका मुख्यालयात मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्याकडे सुपुर्द केले.


          औरंगाबाद शहरातील अनियमित मालमत्ता जसे की प्लॉट, घर व दुकानांना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्याची संधी महानगरपालिकातर्फे उपलब्ध करुन देण्यात आली होती. परंतु अनियमित मालमत्ताधारक नागरीकांना त्यांच्या मालमत्ता नियमित करण्यासाठी कागदपत्रांचे पुरेसे ज्ञान नसल्याने तसेच मालमत्ता नियमित झाल्यानंतर त्याचे होणारे फायदे माहित नसल्याने शासनाच्यावतीने उपलब्ध करुन देण्यात आलेल्या संधी पासुन नागरीक वंचित राहणार होते. म्हणुन खासदार इम्तियाज जलील यांच्या विशेष प्रयत्नाने एमआयएम पक्षातर्फे नागरीकांना सहकार्य व मागदर्शन करण्यासाठी गुंठेवारी वॅâम्प दारुस्सलाम कार्यालय, बुड्डीलेन येथे आयोजित करण्यात आले होते.
          यावेळी एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष समीर साजीद बिल्डर, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, मुन्शी पटेल, मा.गटनेता नासेर सिद्दीकी, मा.विरोधी पक्षनेता अय्युब जागीरदार व फेरोज खान, मा.नगरसेवक गंगाधर ढगे, अज्जु नाईकवाडी, अबुल हसन हाश्मी, अरुणभाऊ बोर्डे, आरेफ हुसैनी, इसाक हाजी, रफत यार खान,  रफीक खान, साबेर खान, अब्दुल मतीन, अनिस खान, कलीम खान, अमर चाऊस, मेहराज खान, मतीन पटेल, इम्तियाज खान, शारेक अन्सारी, नवाज कुरेशी, आखिब खान, सय्यद सिराज, शेख अवेज, असद चाऊस, शेख खलील, बुऱ्हाण पटेल, रिजवान खान व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.            

४६११ मालमत्तांना गुंठेवारी कायद्यातंर्गत नियमितीकरण करावे
          खासदार इम्तियाज जलील यांनी मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना एमआयएम पक्षातर्फे आयोजित गुंठेवारी कॅम्प मध्ये जमा करण्यात आलेल्या ४६११ मालमत्ताधारकांच्या मालमत्ता गुंठेवारी कायद्यातंर्गत नियमित करण्याचे पत्राव्दारे कळविले.
          प्रशासक यांना दिलेल्या पत्रात औरंगाबाद शहरात मागील ३० ते ४० वर्षात आरक्षीत जागेवरील विकसित झालेल्या सर्व गोरगरीब वसाहतीमधील आरक्षणे रद्द करावे तसेच आरक्षीत जागेवर व हरित पट्टयात विकसित झालेल्या वसाहतीना गुंठेवारी कायदा अंतर्गत नियमित करुन सर्वसामान्य नागरीकांना न्याय देण्याकरिता योग्य ती कार्यवाही करण्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी नमुद केले.

हरित पट्टयात व आरक्षीत जागेवर विकसित वसाहतींना सुध्दा गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमितीकरण करावे – खासदार इम्तियाज जलील
          खासदार इम्तियाज जलील यांनी यापुर्वीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव महाराष्ट्र शासन व प्रधान सचिव नगरविकास यांच्याकडे औरंगाबाद मनपा हद्दीतील हरित पट्टयात व आरक्षीत जागेवर मागील ३० ते ४० वर्षात विकसित झालेल्या वसाहतींना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमितीकरण करण्याची मागणी केली होती. तसेच मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना हरित पट्टयातील व आरक्षीत जागेवरील मालमत्ता नियमितीकरण करण्यासाठी योग्य तो प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्याचे पत्राव्दारे कळविले होते.