कलेक्टरच्या "नरेंद्रशाही" फार्मनाविरुद्ध पेट्रोल पंपचालकांचा "विनम्र पेट्रोलपंप बंद" आंदोलन?

कलेक्टरच्या "नरेंद्रशाही" फार्मनाविरुद्ध पेट्रोल पंपचालकांचा "विनम्र पेट्रोलपंप बंद" आंदोलन?

औरंगाबाद : दि. 24 : औरंगाबाद जिल्ह्याच्या कलेक्टरांनी कोविड प्रतिबंधक लस घेणे सक्तीची करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेप्रमाणे नवनवीन प्रयोग औरंगाबाद जिल्ह्यात करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी कोवीड प्रतिबंधक लस न घेतलेल्या लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणित आपल्या अधिकारांचा "सदुपयोग" करुन दैनंदिन जीवनावश्यक सेवा व वस्तूंसह पेट्रोल-डीजल देण्यात येऊ नये म्हणून फर्मान काढले. त्यांच्या फर्मानाला पेट्रोल पंप चालकांनी केराची टोपली दाखविल्याचे कलेक्टरांचे लक्षात आल्याने त्यांचा पारा चढला. त्यांनी बाबा पेट्रोल पंपाला सील ठोकले. पेट्रोल-डिझेल भरण्यास येणाऱ्यांचे कोवीड प्रतिबंधक लस तपासण्याची जबाबदारी पण कलेक्टरांनी पेट्रोल पंपचालकांवर टाकली आहे. तपासणी करण्यासाठी लागणाऱ्या स्टॉफचा खर्च पण पेट्रोल पंप चालकांनी सोसावयाचा असल्याने औरंगाबाद पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशन नी औरंगाबादेत  संध्याकाळी सात वाजेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत "पेट्रोलपंप बंद" ठेवण्याचा निर्णय घेत एक प्रकारे आंदोलनच सुरू केले आहे. औरंगाबाद पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशन नी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची घोषणा केली आहे.
औरंगाबाद पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी इंग्रजीत जारी केलेली प्रेस नोट खालील प्रमाणे;


"The Petroleum Dealers Association of Aurangabad District 

Press Note

We at the Petrol pump dealers association of Aurangabad are in receipt of orders from Hon.Collector Office to verify vaccination status of our customers before we dispense fuel to them. To follow the orders and support the initiatives of Hon.Collector we need to focus our manpower in the verification process apart from regular duties owing to which we will have to curtail our work timings. Starting tomorrow Petroeum outlets in the district will operate from 8AM to 7PM to accommodate for lack of manpower. 
We appeal to our customers and public in general to co-operate with us by keeping vaccination certificate ready when entering the pump and following all COVID protocols.

Secretary PDA
Aqueel Abbas"

कलेक्टरांच्या या फर्माना बाबत महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा