प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने अध्यावत करणार मतदार याद्या : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने अध्यावत करणार मतदार याद्या : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद, दिनांक 29 : प्रशासन व लोक प्रतिनिधी, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांच्या समन्वयाने जिल्ह्यातील मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम केले जाणार असून यासाठी प्रशासनाने विशेष मतदार नोंदणी मोहिम हाती घेतली आहे. मतदार नोंदणी याविषयीची माहिती आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्ष प्रतिनिधीच्या समवेत झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.   
  या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत कदम  यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.   मतदार यादी अचूक आणि 18 वर्षे पूर्ण झालेल्याची मतदार यादीत नोंदणी होणार आहे.  1 जानेवारी 2022 अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुर्नरीक्षण कार्यक्रमा अंतर्गत प्रारुप यादी संदर्भात राजकीय पक्ष प्रतिनिधीच्या समवेत असलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. 

 जिल्ह्यात 2011 च्या जनगणेप्रमाणे 37 लक्ष 1 हजार 282 इतकी लोकस्ंख्या आहे. प्रारुप मतदार यादी  नुसार जिल्ह्याची एकूण मतदार संख्या 28 लक्ष 99 हजार 110 इतकी आहे. त्यात पुरुष 15 लक्ष 29 हजार 461 व महिला 13 लक्ष 69 हजार 619 व इतर 30 इतकी लोकसंख्या आहे. जिल्ह्यात 9 विधानसभा व 2 लोकसभेचे कार्यक्षेत्र आहेत. तर एकूण मतदान केंद्रे दोन हजार 806 आहेत. एकूण महसूल गावे एक हजार 356 आहेत. ग्राम पंचायत 868 आहेत. 

 भारत निवडणूक आयोगाच्या 03 ऑगस्ट 2021 च्या पत्रानुसार दिनांक 01 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे. जिल्‌हयातील सेनादलाची एकूण मतदार संख्या 2 हजार 584 आहे. मतदार नोंदणी करण्यासंदर्भात ज्या व्यक्तीचे वय 01 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण होणार आहे अशा सर्व व्यक्तींना या मोहिमेअंतर्गत मतदार नोंदणी मतदाराला मतदार नोंदणी सुलभतेने करता यावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाने Voter HelpLine App,Voter Portal व NVSP.in या ऑनलाइन प्रणालीचा वापर सुरु केलेला आहे. या ऑनलाइन प्रणालीवर मतदार त्याच्या वयाचा पुरावा. रहिवासी पुरावा व त्याचा नजिकच्या कालवधीतील फोटो इत्यादीची माहिती Upload करुन मतदार नोंदणी करु शकतो. तसेच ज्या व्यक्तीचे वय 22 वर्षापेक्षा जास्त आहे पण त्याची मतदार नोंदणी झालेली नाही अशा व्यक्तींनी पुराव्या व्यतिरिक्त Form 6 सोबतचे Declaration फॉर्म भरुन स्वाक्षरीसह Upload करावे. Declaration फॉर्मचा नमुना वेबसाईटवर आहे, अशी माहिती देण्यात आली. 

 मतदार नोंदणी साठी तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक ग्राहक सेवा केंद्र (CSC) येथेही ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणी करता येईल. ज्या व्यक्तीना ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी करणे शक्य नाही त्यांनी औरंगाबाद जिल्‌ह्यातील त्यांच्या क्षेत्रातील, नगर वस्ती याठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावरील संबंधीत मतदान केंद्रास्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे ऑॅफलाईन प्रत्यक्षपणे फॉर्म देऊन मतदार नोंदणी करु शकतात. तसेच जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्या कार्यालयात ऑॅफलाईन देऊन मतदार नोंदणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
मतदार नोंदणी वेळापत्रक 

अ.क्र उपक्रम कालावधी
पुनरीक्षण कार्यक्रम
1. एकत्रीकरण प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे दि.01 नोव्हेंबर,2021 (सोमवार) 01 नोव्हेंबर 2021
2. दावे हरकती स्विकारण्याच्या कालावधी दि.01 नोव्हेंबर.2021 (सोमवार) ते दि.30नोव्हेंबर 2021 (मंगळवार)
3. विशेष मोहिमांचा कालावधी 1) 13 नोव्हेंबर 2021  (शनिवार) व दि.14 नोव्हेंबर 2021 (रविवार)
2) दि.27 नोव्हेंबर 2021 शनिवार व 28 नोव्हेंबर 2021(रविवार)
4. दावे व हरकती निकाली काढणे दि.20डिसेंबर 2021 (सोमवार) पर्यंत
5. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे दि.05 जानेवारी 2022 (बुधवार)