एसटी वाहक व चालकाचा प्रमाणिकपणा : दीड लाखाचे दागिन्याची पर्स प्रवाशाला केली परत...

एसटी वाहक व चालकाचा प्रमाणिकपणा : दीड लाखाचे दागिन्याची पर्स प्रवाशाला केली परत...

तेल्हारा : (प्रतिनिधी मोतेबर देशमुख कडून) 
एस टी महामंडळाचे तेल्हारा डेपोत कार्यरत महीला वाहक सौ. किरण सोसे आणि चालक जामणीक यांच्या बस क्रमांक MH 40 N 4303 मध्ये महीला प्रवाशी सलमाबी मोबीन खान रा. वाशिम बायपास, अकोला यांची बँग बस मध्ये  राहली होती. त्यामध्ये अंदाजे 1,50,000 (दिड लाख रूपय) किमतीचे सोन्याचे दागिने व कपडे इत्यादी असलेली बँग वरिल  वाहक व चालक यांनी त्याची शहानिशा करुन परत केली. 

        वाहक आणि चालक यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा मान्यता प्राप्त युनियन, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, तेल्हारा आगार तर्फे शाल व श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.  यावेळी नवीन प्रभारी आगार व्यवस्थापक महल्ले यांच्या सुध्दा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम चे अध्यक्ष आगार व्यवस्थापक होते व संचालन राखोंडे यांनी केले. याप्रसंगी तेल्हारा आगारातील कर्मचारी व  महाराष्ट्र एस टी कामगार संघटना, तेल्हारा आगारातील पदाधिकारी  उपस्थित होते.