भारताच्या सार्वभौमत्वाचा अधिकार मोदीने ट्रम्पला सोपवला का.....? : अनंत भवरे

"युद्ध हे कुणालाही अपेक्षित नाहीच. यात शंकाच नाही......
युद्ध थांबले ही गोष्ट सर्वसामान्य जनतेच्या दोन्ही देशांच्या हिताच्या दृष्टीने अगदी योग्यच झाले.....
परंतु , ज्या पद्धतीने हे युद्ध थांबले, त्यातून भारताच्या सार्वभौमत्वाचा अधिकार भारताने गमावून बसवला की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
जेंव्हा 1971 मध्ये माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी भारत पाकिस्तान युद्धात नाक खूपसणाऱ्या तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निक्सन यांना खडे बोल सुनावले होते.....
तेंव्हा याच भाजपाच्या अट्टलबिहारी वाजपेयी यांनी आयर्न लेडी म्हणून त्यांचा गौरव केला होता. त्यानंतर 1972 मध्ये सिमला करारात तर यावर शिक्कामोर्तबच झाले.
या सिमला करारातील प्रथम क्रमांकाचा करार हाच होता की, भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील मतभेद किंवा संघर्ष सोडविण्यासाठी कोणत्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थी स्विकारल्या जाणार नाही.
कारण हे दोन्ही देश आपापल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास सक्षम आहेत.
परंतु..........
आज युद्धबंदीची घोषणा अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पनी केली.........!
पाकिस्तान किंवा भारताने किंवा दोघांनी संयुक्त बैठकीतून करणे अपेक्षित होते........
डोनाल्ड ट्रम्पला हा अधिकार कुणी दिला?
आणि हा आदेश भारताने अर्थात मोदीने कसा मान्य केला.....?
जेंव्हा देशावर युद्धाची वेळ पहलगामच्या प्रकरणामुळे, तेंव्हा तुम्ही सर्वपक्षीय बैठक बोलावून विरोधकांचा पाठिंबा मिळविला आणि त्यांनी सुद्धा देशाच्या रक्षणासाठी बिनशर्त दिला............
परंतु , पाकिस्तान समर्थक अतिरेक्याना कायमचा धडा शिकविण्यासाठी मोदी तुम्ही जी मोहीम ऑपरेशन सिंदूर उघडली. तेंव्हा सर्व देश तुमच्या पाठीशी उभा राहिला.
परंतु , अतिरेक्याना कायमचा धडा शिकविण्याची मोहीम चालू असताना.......
पूर्णत्वास गेलेली नसताना.......
ती तुम्ही का थांबवली.....?
ती सुद्धा सिमला कराराचे उल्लंघन करून.......
जे की तिसरा देश यामध्ये पडलाच नाही पाहिजे, असे असताना सुद्धा........
या एका तुमच्या मुद्दाम केलेल्या चुकीमुळे आम्ही आमच्या सार्व भौमत्वाचा हक्क आम्ही गमावून बसलो. अशी प्रतिमा संपूर्ण जगात आमची झाली......!
ज्या देशाचे तुम्ही स्वयंघोषित विश्व् गुरु आहात. तोच देश तुम्ही डोनाल्ड ट्रम्पच्या पुढे देशाचा स्वाभिमान गहाण ठेवणार का.......?
अगदी आम्ही दहशत वाद्याचा कायमचा खात्मा करण्याच्या अगदी टोकाला येऊन पोहोचलो होतो. पाकिस्तानला सुद्धा ही भीती वाटलीच होती. परंतु त्यांनी 4 जुलै 1999 एक चाल खेळली त्यात ते अपयशी ठरले. मात्र आज ते यशस्वी झाले.
जेंव्हा कारगिल युद्ध पाकिस्ताननेच सुरु केले. त्यावेळी सुद्धा आपण अशाच शेवटच्या जिंकण्याच्या स्थितीत होतो. तेंव्हा पाकिस्तान पराभवाच्या उंबरठ्यावर असताना तत्कालीन पाकिस्तानचे प्रधानमंत्री नवाजशरीफ आणि लष्करप्रमुख परवेज मुशरफ धावतच अमेरिकेला मध्यस्थी करण्याची विनंती करण्यासाठी गेले. त्या दिवशी 4 जुलै अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन होता. यांना तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बील क्लिंटन यांनी भेटच नाकारली. तेंव्हा अती विनंती नंतर क्लिंटन यांनी त्यांनाच खडे बोल सुनावले की, तुम्हीच एल. ओ. सी. ओलांडली आहे. आता तुम्हीच माघार घ्या.
तेंव्हा माघारी येऊन पाकिस्तानने टायगर हिल वरील आपल्या 250 सैनिकांच्या बॉडी सुद्धा तेथेच सोडून कारगिल युद्धातून माघार घेतली. त्या बॉडी भारताने नंतर हेलिकॉप्टरने काढल्या.
नेमकी हीच चाल आजही पाकिस्तानने खेळली. आणि आमच्या विश्व् गुरुची मुत्सदेगिरी आयर्न लेडी सारखी स्वाभिमानी न ठरता नांगी टाकणारी नेभळट ठरली......!
या सीझफायर मुळे मात्र पाकिस्तानचाच लाभ झालेला आहे. टो पुन्हा दहशतवादी संघटना मजबूत करण्यासाठी, पुन्हा पहलगामसारखा धडा शिकविण्यासाठी एक पाऊल अमेरिकेच्या मदतीने मागे येऊन त्यानेच यश मिळवून घेतले.......!
"आम्ही मात्र खाया पिया कुछ नही, ग्लास तोडा बारा आणा "
अशी अवस्था आज आमची झाली आहे. याला जबाबदार कोण....?
याचे दुरगामी परिणाम आम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा भोगावे लागतील......!
या सर्व परिस्थितीला आणि नुकसानीला कोण जबाबदार......?
RSS , मोदी, शहा, मोहन भागवत, भाजप, ट्रम्प........
आणखी कोण.....?
याला जबाबदार.........
आम्ही भारताचे लोकं.......!
कारण आम्ही लायक नसलेल्याना, नालायक राज्यकर्त्यांना EVM ला विरोध न करता तिसऱ्यांदा सत्तेवर बसवले......
कदाचित तेवढेच जबाबदार आम्ही सुद्धा आहोत. हे नाकारता येणार नाही.
देशाला एका संविधाननिष्ठ खंबीर आणि कणखर नेतृत्वाची आवश्यकता आहे. आणि ती क्षमता भाजपात कधीच असू शकत नाही ( असती तर तिसऱ्यांदा तोच बसला नसता) ........!
या सीझफायर मुळे आम्ही पुन्हा बॅकफूटवर आलो की काय अशी शंका येत आहे. शिवाय द्विपक्षीय चर्चेतून पाकिस्तान पुन्हा अतिरेक्यांच्या मदतीने नेहमीप्रमाणेच पहलगाम घडवणार असेल तर यात नवल वाटण्यासारखे काही राहणार नाही........!
आजपर्यंतच्या भारताच्या इतिहासातील एकमेव अपयशी प्रधानमंत्री म्हणजे आजचे प्रधानमंत्री ठरलेले आहेत. हीच देशाची खरी शोकांतिका आहे......!!"
या सर्व प्रकारच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रथम येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीतून EVM ला कायमचे हद्दपार करूया....
आणि संविधानातून जागृत होऊन आपण आपल्या मूलभूत अधिकाराचे रक्षण करूया......
तेंव्हाच आपण आपल्या देशाच्या मूलभूत अधिकाराचे अर्थात सार्वभौमत्वाच्या अधिकाराचे रक्षण करू शकू..........
जागृतीचा कृतिशील लेखक :- अनंत केरबाजी भवरे ( संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689)