ते २० मराठी जोक्स
(1) जोश्यांच्या घरातून भांडणाचा आवाज ऐकून बंडोपंतानी घरात डोकवलं.
जोशी दांपत्य भांडत होतं आणि कोचावर दोन माणसं बसली होती.
“काय झालं?” बंडोपंतानी त्यातल्या एकाला विचारलं.
तो म्हणाला, “आम्हालाही माहीत नाही.
आम्ही जनगणना अधिकारी आहोत.
कुटुंबप्रमुख कोण? नुसतं एव्हढंच विचारलं.”
(2) बॉस : ऑफिसला का नाही आलास? पाऊस तर थांबला होता .
गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते..
कुठे ही जाऊ नका, पाहत रहा ABP माझा.
(3) BF: मला तुझे ‘दात’ खूप आवडतात..
GF: अय्यां… खरंच.. का रे?
BF: कारण ‘Yellow’ माझा फेवरेट कलर आहे.
(4) तो तिला म्हणाला,
जीना सिर्फ मेरे लिए !
ती म्हणाली,
“ठीक आहे मी ‘लिफ्ट’ ने जाते,
तू ये जिन्याने !”
(5) शिक्षक: उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन.
पप्पू: ओके सर, पण जरा झणझणीत बनवा.
मी रॉयल स्टॅगचा खंबा घेऊन येतो.
(6) योगेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला.
मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?
योगेश : ते नंतर, आधी पोहे, चहा
आणि मुलगी बघणे तर होऊ द्या.
मग बसू !
(7) एकदा तरूण मुलांचा ग्रुप दिंडीला निघतो,
गूरूजी कानमंत्र सांगतात ?
रस्त्यात जर सुंदर मुलगी दिसली
तर फक्त हरि ओम ! म्हणायचं.
म्हणजे लक्ष विचलित होणार नाही.
थोडे अंतर चालल्यावर एक जन
!! हरि ओम !! म्हणतो..
लगेच बाकी सारे एका सूरात म्हणतात ?
कुठंय कुठंय !
(8) नवरा: जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील?
बायको: अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल
तु खुश मी पण खुश.
नवरा: २० रुपयांची लागली आहे,
हे घे १० रूपये आणि चल निघ.
(9) लहानपण आणि मोठेपण यात काय फरक आहे?
लहानपणी चिवडा, फरसाण, चकली याला
‘खाऊ’ बोलणारी मुले,
मोठी झाल्यावर यालाच ‘चकना’ म्हणतात.
(10) गुरुजी :-गण्या, मी तुला कानफटीत मारली
ह्याचा भविष्यकाळ सांग बघू?
गण्या :- जेवनाच्या सुट्टीत तुमची फटफटी पंक्चर होनार!
(11) एका मैत्रिणीने Hi पाठवलं.
मी पण रीप्लाय दिला
Hi म्हणून..
तिने विचारलं काय चालु आहे.
मी रीप्लाय दिला.
२ ट्युब लाइट.. १ फॅन.. १ टीव्ही.
१ मोबाइल अणि तु..
डायरेक्ट ब्लॉक केलं ना राव!
(12) केमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं,
डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर
डॉक्टरची चिट्ठी घेऊन या,
प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?
(13) चिंटुः आई परी आकाशात उडते का गं?
आईः हो..
चिंटु: मग आपली कामवाली का नाही उडत आकाशात?
आईः अरे वेडया ती कशी उडेल? ती परी आहे का?
चिंटुः पण बाबा तिला तर परी म्हणतात,
आईः हो का! मग उद्या उडेल ती बघच तु !
(14) बायको: माझी मैत्रीण येणार आहे,
दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा..
नवरा: बरं.. पण वचन दे,
माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस बाहेर झोपशील!
(15) एका मुलीने,
आपल्या होणाऱ्या नवऱ्याला मॅसेज सेंट केला,
आपलं लग्न होवू शकत नाही कारण माझं
लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरले आहे..
मुलगा मॅसेज वाचुन खुप
दुःखी होतो आणि रडायला लागतो..
२ मिनिटांनंतर त्या मुलाला मॅसेज येतो,
सॅारी, सॅारी!
चुकून तुम्हाला हा मॅसेज सेंट झाला !
(16) तीन उंदीर गप्पा मारत असतात,
पहिला उंदीर : मी विषारी गोळ्या आरामात चघळतो..
दुसरा उंदीर : मी पिंजऱ्यातील पनीर आरामात खाऊन बाहेर येतो.
तिसरा उंदीर उठतो आणि जायला लागतो,
पहिला आणि दुसरा विचारतात, काय झालं कुठे चालला?
तिसरा उंदीर म्हणतो आलोच मांजरीचा किस घेऊन.
(17) एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच
जिभेवर हळद, कुंकु नि अक्षदा
लावत होती तेवढ्यात.
नवरा:- अगं हे काय करतेस?
बायको:- अहो दसरा आहे ना आज !
म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं.
(18) नवरा बायकोचं भांडण चालु असतं.
नवरा: तु स्व:तला आवर नाहीतर
माझ्या मधला जनावर बाहेर येईल
बायको: हा हा येऊ दे ऊंदराला कोण घाबरतंय!
(19) वडील: अरे, एक काळ असा होता,
की मी पाच रुपयांत किराणासामान दूध, पाव
आणि अंडी घेऊन यायचो.
मुलगा: आता ते शक्य नाही, बाबा!
आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय !
(20) ट्रेन मध्ये गावाकडील बाई लहान
बाळाचे लंगोट बदलत असते.
शहरी बाई: हग्गीस नाही का?
गावाकडील बाई: नाही, फक्त मूतीस.
(21) बायको: जेव्हा तुम्ही देशी पिता,
तेव्हा मला ‘परी’ म्हणता..
बिअर पिता तेव्हा ‘डार्लिंग’ म्हणता..
मग आज असं काय झालं की तुम्ही मला ‘डायन’ म्हणालात.
नवरा: आज मी “स्प्राईट” पिलोय,
“सिधी बात नो बकवास”
(22) मुलगी: माझे हृदय म्हणजे माझा
मोबाईल आहे आणि तू त्यातले
सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस..
मुलगा: राणी एक विचारू ?
मुलगी: हो विचार ना..
मुलगा: मोबाईल डबल सिमचा तर नाही ना ?
(23) गंप्या एका मुलीला मिनी स्कर्ट मध्ये पाहतो,
गंप्या: तुला आई ओरडत नाही का?
मुलगी: हो, आजच ओरडली तिचा ड्रेस घातला म्हणून.