एमआयएममधील ‘तिकीट युद्ध’! किराडपुरा पेटला – असरार विरुद्ध इसाक खान समर्थकांची धक्काबुक्की!
संभाजी नगर (औरंगाबाद) दि. २६ डिसेंबर: एमआयएमने दुपारी दुसरी उमेदवार यादी सोशल मीडियावर टाकली... आणि किराडपुरा थेट उकळायला लागला! प्रभाग १२ मध्ये सर्वसाधारण जागेवरून युवा शहराध्यक्ष मोहम्मद असरार यांना तिकीट मिळाले. पण इथं तिकीटाची वाट बघणारे हाजी इसाक खान आणि त्यांचे समर्थक संतापाने ताडकन पेटले!
असरार यांनी उमेदवारी मिळताच नागरिकांना भेटण्यासाठी रॅली काढली. जागोजागी सत्कार, हार… पण गर्दीत इसाक खान गटाचा राग उसळला! हार काढून फेकला, धक्काबुक्की झाली – अशी सूत्रांची माहिती! जीन्सी पोलिसांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला, नाहीतर आज प्रभाग १२चा नकाशाच बदलला असता!
गर्दी थेट पोलिस ठाण्यासमोर – इसाक खान यांचा समर्थकांचा संताप!
दोन्ही गटांचे कार्यकर्ते जीनसी पोलिस ठाण्यासमोर जमले. प्रदेश महासचिव समीर साजिद बिल्डर यांनी शांतता करण्याचा प्रयत्न… पण जमाव तापलेल्या तव्यावर पाण्यासारखा उडत होता!
इसाक खान समर्थकांचा आरोप –“रात्रंदिवस पक्षासाठी काम, मतं आणतो आम्ही… आणि निष्ठावंत कार्यकर्त्याचा तिकीट कापलंत?”
गोंधळ वाढत असतानाच, हाजी इसाक खान स्वतः गाडीवर चढले आणि म्हणाले “शांतता ठेवा. कायदा हातात घेऊ नका.” “जनतेचा निर्णय मला मान्य असेल." हे ऐकताच राडेखोर शांत… आणि मंडळी घरी परतली. तक्रारही नाही. दोन्ही टीम्स – डावीकडून उजवीकडे – घरी!
तिकीट संकट – आता निर्णय ओवेसींच्या कोर्टात!
या राड्यानंतर प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलिल यांनी स्पष्ट उत्तर दिलं –“उमेदवार ठरवणारा मी नाही! फक्त मुलाखती माझ्याकडे. निर्णय घेतात राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी. मी तर फक्त यादी जाहीर करतो!”
एम आय एम चे वरिष्ठ नेते हा राग कसा शांत करणार?इसाक खान समर्थकांना गोड बटाटा देणार? की असरारचा तिकीट घट्ट ठेवणार? सगळ्यांचे डोळे – आता फक्त हैदराबाद कडे!