डॉ. आंबेडकर मिशन दवाखान्याची दर रविवारी मोफत ओपीडी सुरू

संभाजीनगर, १४ सप्टेंबर : डॉ. आंबेडकर डॉक्टर्स असोसिएशन (दामा) हेल्थकेअर फाउंडेशनतर्फे प्रत्येक बौद्ध विहारात मोफत ओपीडी सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून आज धम्मदीप बौद्ध विहार (एन-7 सिडको), आनंद बौद्ध विहार (एन-6 सिडको) आणि सातवाहन बौद्ध विहार (एन-12 सिडको) येथे ओपीडीला सुरुवात झाली.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद दुथडे यांच्यासह डॉ. आर. जी. नरवडे, डॉ. शिवराज लाळीकर, डॉ. सुनील पगडे, डॉ. पल्लवी अभ्यंकर, डॉ. आनंद तारू आदी मान्यवर उपस्थित होते.
दवाखान्यासाठी अनेक समाजबंधूंनी सहकार्य केले. त्यात शरद जाधव, अशोक आनंदराव, के. बी. दिवेकर, रत्नदीप थेरो, भिक्खुनी भिमकन्या थेरी, शेषराव कदम, धीरज सूर्यवंशी, धर्मराज गवई, गंगाराम वाघमारे, तात्याराव साबळे, साळवे बाबा, कुसुमबाई माटे, छाया सुरडकर, ताराबाई बनकर, सविता सोनवणे, समुद्रबाई जमधडे, प्रशांत सोनवणे, बागुलबाई, ज्योती लोणे, विजय मगरे, शशिकांत खंडागळे, नंदू दाभाडे, राहुल सरोदे व मस्के यांनी मिळून दवाखान्यासाठी ९ हजार रुपयांचे साहित्य दिले. तसेच रामदास बनसोडे यांनी ५०० रुपये आणि भानुदास बागुल यांनी ५ हजार रुपयांचे सहकार्य केले.
पहिल्या दिवशी या ओपीडीमध्ये ३२७ रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि त्यांना औषधे व गोळ्या मोफत देण्यात आल्या. नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून पुढे दर रविवारी ही ओपीडी सुरू राहणार आहे.