पेट्रोल 150 तर डिझेल 140 रुपये प्रति लिटर....

पेट्रोल 150 तर डिझेल 140 रुपये प्रति लिटर....

पेट्रोल 150 तर डिझेल 140 रुपये लिटर होणार? कच्च्या तेलाच्या किंमतवाढीचा परिणाम...

सध्या अनेक शहरात पेट्रोल 115 रुपये लिटर झाले आहे आणि डिझेल 100 रुपयाच्या वर गेले आहे.

पुढील वर्षात पेट्रोलचा दर 150 रुपये लिटर तर डिझेलचा रेट 140 रुपये लिटर होण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. करा मधील भरमसाठ वाढ आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातील तेजी याचा हा परिणाम आहे.

सध्या अनेक शहरात पेट्रोल 115 रुपये लिटर झाले आहे आणि डीझेल ही 100 रुपयाच्या वर गेले आहे. 

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर सध्या प्रति बैरल 85 डॉलर झाले आहेत. "गोल्डमॅन" च्या अंदाजानुसार या वर्षाच्या अखेरपर्यंत कच्चे तेल 100 रुपये डॉलर वर जाईल पुढील वर्षी ते 110 डॉलरवर पोहोचेल. 2008मध्ये कच्च्या तेलाचे दर सर्वाधिक 147 डॉलर प्रति बैरल होते. हा टप्पाही लवकरच गाठला जाऊ शकतो. 

कच्च्या तेलाचे दर काहीही असले तरी केंद्र आणि राज्य सरकारे करात कपात करण्याची शक्यता नाही. सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाची मागणी 99 दशलक्ष बॅरल प्रतिदिन इतकी आहे. ती लवकरच ग
कोविडपुर्व काळाच्या पातळीवर जाऊन 100 दशलक्ष बैरल प्रतिदिन होईल.

जून 2014 मध्ये सरकारी तेल वितरण कंपन्या डिलरांना 49 रुपये लिटरने पेट्रोल देत होत्या. डीलर चे मार्जिन आणि केंद्र व राज्यांचे कर मिळून 74 रुपये प्रतिलिटरने पेट्रोल ग्राहकांना मिळत होते. अंतिम किरकोळ किमतीत तेल कंपन्यांना 66 टक्के, तर डीलर चे कमिशन आणि कर 34 टक्के अशी शेजारी होती.

2014 मध्ये जे कर होते तेच आज कायम ठेवले गेले असते, तर पेट्रोल 66 रुपये प्रतिलिटर या दराने मिळाले असते. तसेच डिझेल 55 रुपये दराने मिळाले असते.