कोरोनाला महाराष्ट्रातच फिरायला आवडते : खासदार इम्तियाज़ जलील

कोरोनाला महाराष्ट्रातच फिरायला आवडते : खासदार इम्तियाज़ जलील

कोरोनाला महाराष्ट्रातच फिरायला आवडते : खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने दिवसा जमावबंदी आणि रात्री संचार बंदी लावण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर औरंगाबाद चे खासदार इम्तियाज़ जलील यांनी पुन्हा टीका केली. या निर्णयानंतर त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये कोरोना विषाणूची राज्याच्या उच्चपदस्थ नोकरशाही सोबत बैठक झाली. या बैठकीत कोरोनाने तो रात्री सक्रिय असेल अशी धमकी दिली. या धमकी नंतरच रात्री संचार बंदी जाहीर करण्यात आली आहे. तसेच कोरोना विषाणू ला महाराष्ट्रातच फिरण्यास आवडते. अशीही टीका इम्तियाज़ जलील यांनी केली.

https://twitter.com/imtiaz_jaleel/status/1479828707564920833?t=b9m5M-iIg5EeUHiJz_Fj8g&s=

खासदार इम्तियाज़ जलील यांनी शनिवारी त्यांच्या ट्विटरवरुन दोन ट्विट केले. राज्य सरकारने दिवसा जमावबंदी आणि रात्री संचार बंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर हे ट्विट करण्यात आले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये रात्रीच्या लॉकडाउन बाबत टीका केली. कोरोना विषाणूची राज्याच्या उच्चपदस्थ नोकरशाही सोबत बैठक झाली. या बैठकीत कोरोना ने तो रात्री सक्रिय असेल अशी धमकी दिली. या धमकीनंतर रात्री संचार बंदी जाहीर करण्यात आली आहे. असे म्हटले आहे.

https://twitter.com/imtiaz_jaleel/status/1479828709649489928?t=svlOJ5x-TF8259WjGViYog&s=19

खासदार इम्तियाज़ जलील यांनी कोरोना विषाणू सोबतच्या बैठकीचा ट्वीट करण्यापूर्वी एक आणखी ट्विट केले. यामध्ये निवडणूक आयोगाने पाच राज्यांमध्ये निवडणुकीची घोषणा ज्या दिवशी केली त्याच दिवशी महाराष्ट्र सरकार पुन्हा राज्यात निर्बंध घालून सर्वसामान्यांच्या हालचाली बंद करीत आहे. हा निर्णय मूर्खपणाचा असू शकतो असे सांगत इम्तियाज़ जलील यांनी कोरोना च्या विषाणूला महाराष्ट्रात फिरायला आवडत आहे. यानंतर आणखी काही धक्क्यांसाठी सावध राहावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच निवडणुका असलेल्या राज्यात विषाणूला फिरायला आवडत नसल्याचे ही खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.