अख्या जगात भारताचे नांव रोशन करणाऱ्या औरंगाबादचे सुपुत्राचा नागरी सत्कार

अख्या जगात भारताचे नांव रोशन करणाऱ्या औरंगाबादचे सुपुत्राचा नागरी सत्कार

औरंगाबाद, १३ ऑगस्ट: जगातील सर्वोत्कृष्ट असे अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून सलग दोन वर्षांपासून "टॉप 2% गणिततज्ञांनी" (Top 2% Mathematician) म्हणून सन्मानित करण्यात येत असलेले औरंगाबादचे सुपुत्र डॉअख्या जगात भारताचे नांव रोशन करणाऱ्या औरंगाबादचे सुपुत्राचा नागरी सत्कार शरीफ देशमुख यांचा आज औरंगाबाद येथील मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे क्रिसेंट एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी आणि एपल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भरगच्च सभागृहात नागरी सत्कार करण्यात आला. स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून असा सन्मान प्राप्त करणारे ते महाराष्ट्रातील एकमेव आणि भारतातील दुसरे गणितज्ञानी आहेत. 

      डॉ. शरीफ देशमुख हे सऊदी अरब येथील विश्वविख्यात किंग सऊद विद्यापीठ, रियाज येथे प्रोफेसर असून रिसर्च सायंटिस्ट आहेत. त्यांच्या नावावर आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये १९१ शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी पीएचडी प्राप्त केली असून सध्याही अनेक विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी ते मार्गदर्शन करीत आहेत.
डॉ. शरीफ देशमुख हे मूळचे सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील रहिवाशी असून त्यांनी देवगिरी महाविद्यालयातून गणित विषयात बीएससी डिग्री प्राप्त करून मराठवाडा विद्यापीठातून एमएससी ची डिग्री टॉपर पोझिशनमध्ये प्राप्त केली. आंबेजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात दहा वर्षे त्यांनी प्रोफेसर म्हणून आपली सेवा दिली. अलिगड मुस्लिम विद्यापीठातून पीएचडी ची डिग्री प्राप्त केली. तसेच चार वर्षे त्या विद्यापीठात अध्यापनाचे कार्य पण केले. नंतर सऊदी अरब येथील सुप्रसिद्ध किंग सऊद विद्यापीठात अध्यापनाचे कार्य करीत आहेत.

     या सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थानी आर्किटेक्ट सुलतान वसीम खान होते. मंचावर विविध क्षेत्रातील मान्यवर ज्यात खान मुकीम खान, डॉ. जावेद मुकर्रम, प्रा. डॉ. सुभाष ढोले, खान शमीम, डॉ. अलताफ कुरेशी, काझी अनीस, सीईओ मुकीम देशमुख, माजी आमदार सिराज देशमुख, एनसीपी जालना जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, डॉ. शहाब अफसर, मौलाना डॉ. अब्दुल रशीद मदनी, डॉ. आरिफ अली उस्मानी, डॉ. फैसल खान, डॉ. रिजवान देशमुख, डॉ. इम्रान देशमुख,  डॉ. फरहान देशमुख, वसीम उल्लाह, इत्यादींची उपस्थिती होती.