इम्तियाज़ जलील चा खोटारडेपणा उघड
एम आय एम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार आणि औरंगाबाद पूर्व मतदार संघातून एम आय एम पक्षाकडून निवडणूक लढवीत असलेले इम्तियाज जलील यांनी असे वक्तव्य केले आहे की, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांनी भारतीय जनता पक्षाकडून सुपारी घेऊन ज्या ज्या ठिकाणी एमआयएमचे उमेदवार उभे आहेत त्या त्या ठिकाणी अल्पसंख्यांक मतांची विभागणी व्हावी म्हणून आपले उमेदवार उभे केले आहे. तसेच ते निवडणूक लढवीत असलेले औरंगाबाद पूर्व मतदार संघातून अबू असीम आजमी यांनी त्यांचे विरुद्ध एम आय एम पक्षाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अब्दुल गफ्फार कादरी यांना फोडून त्यांना समाजवादी पक्षाचा तिकीट देऊन त्यांचे विरुद्ध उभे केले आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांचे हे विधान सर्रास खोटारडेपणाचे आहेत.
वस्तूतः स्वतःची पोळी भाजवण्याकरिता त्यांनी डॉक्टर अब्दुल गफ्फार कादरी यांना डावलून स्वतः एमआयएम पक्षाकडून औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळवून घेतली आहे. औरंगाबाद पूर्व मतदार संघच नव्हे तर संपूर्ण औरंगाबाद शहरातील एम आय एम पक्षाचे समर्थन करणाऱ्या मतदारांना इम्तियाज जलील यांना सत्तेची किती लालसा आहे हे माहीत झाले आहे.
औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार डॉक्टर अब्दुल गफ्फार कादरी यांनी आरोप केला आहे की, एमआयएम पक्षातील त्यांच्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीचा अपमान झाला असून त्यांना डावलण्यात आले आहे. कादरींच्या मते, त्यांनी गेल्या दहा वर्षांत या मतदारसंघात विशेष मोहिमेद्वारे सुमारे 40,000 नवीन मतदारांची नोंदणी केली आहे, ज्याचा थेट फायदा एमआयएम पक्षाला झाला. आणि या निवडणुकीत त्यांना हमखास विजय मिळाला असता. परंतु इम्तियाज जलील यांनी त्यांच्याशी गद्दारी करून स्वतः उमेदवारी दाखल केली आहे. या मतदारसंघात इम्तियाज जलील यांनी कोणतेही विकासात्मक कामे केलेली नाही.
इम्तियाज जलील यांनी त्यांची निष्ठा विचारात न घेता स्वतः उमेदवारीसाठी तयारी केली आणि त्यांना तिकीट देण्यात आले नाही. डॉ कादरींनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवित एमआयएमला सोडचिठ्ठी दिली आणि समाजवादी पक्षात प्रवेश केला. जलील हे दावा करत आहेत की, समाजवादी पक्षाने एमआयएमला तोडण्यासाठी डॉ कादरी यांना फोडले, परंतु या दाव्याच्या पार्श्वभूमीवर जलील यांच्यावर बेईमानीचा आरोप केला जातो आहे.
समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. अबू आसिम आझमी यांनी या प्रकरणात जलील यांच्यावर टीका केली आहे. आझमी यांच्या मते, जलील यांचे आरोप आणि त्यांचे बोलणे हे फक्त स्वतःचा दोष दुसऱ्यांवर ढकलण्याचा एक प्रयत्न आहे.
इम्तियाज जलील यांनी डॉक्टर अब्दुल गफार कादरी यांच्यावर केलेल्या खोट्या आरोपांबाबत समाज माध्यमांवर जोरदार चर्चा होत आहे. डॉ कादरी यांनी जलील यांना फडणवीस यांचे "स्टूज" म्हणत, त्यांच्यावर पक्षात फूट पाडण्याचा आरोप केला आहे. कादरी यांच्या मते, जलील भाजपच्या दबावाखाली काम करतात आणि त्यांनी महाराष्ट्रात फक्त स्वतःचे वर्चस्व टिकवण्यासाठी षड्यंत्र केले आहे. या आरोपामुळे एम आय एम च्या कार्यपद्धतीबद्दलही अनेकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. आता इम्तियाज जलील यांनी अकबरुद्दीन ओवेसी किंवा असदुद्दीन ओवेसी यांना जरी औरंगाबाद येथे आणले तरी डॉक्टर गफार कादरी यांच्याशी बेईमानी करणाऱ्या इम्तियाज जलील यांना निवडून द्यायचे नाही. अशी चर्चा समाज माध्यमात जोरात सुरू आहे.
- डॉ. रियाज़ देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त (सेनि), औरंगाबाद.