शहरात दहशत माजवणारा समाजकंटक पोलीसांच्या ताब्यात
छत्रपती संभाजीनगर, १२ फेब्रुवारी: छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर परिसरात हातात कोयता घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यि समाजकंटक सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. रितेश ऊर्फ लड्या नितीन दोडवे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मंगळवारी जंबुरे हॉस्पिटलजवळ एक तरुण कोयता घेऊन लोकांना धमकावत असल्याची माहिती जवाहरनगर पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. बीट मार्शल पथकाने झडप घालत आरोपीला पकडले.
पोलिसांनी आरोपीकडून एक धारदार कोयता, चाकू तसेच विना क्रमांकाची मोपेड जप्त केली आहे. रितेश उर्फ लड्या दोडवे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी, घरफोडी आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला असून पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक होत आहे.