राम मंदिरातील घोटाळ्याचे उत्तरदायित्व कोणाकडे?

राम मंदिरातील घोटाळ्याचे उत्तरदायित्व कोणाकडे?

       "राम मंदिर के चोरो को, जूते मारो सालो को" अशा घोषणा, काल मुंबईमधून ऐकायला मिळाल्या. ज्यांनी राम मंदिराला चांदीच्या विटा अर्पण केल्या अथवा सोने अर्पण केले, ते लोक, आपण अर्पण केलेल्या वस्तूंचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित करत आहेत. परंतु मंदिरात दर्शना करता येणारा सर्वसामान्य माणूस, आपल्या ऐपतीप्रमाणे, 101 रुपये दानपेटी टाकल्याशिवाय, रांगेतून पुढे सरकतच नाही.

       ज्यांनी मोठ्या रकमा दिल्या, त्यांना, त्या रकमेच्या पावत्या दिल्या गेल्या नाहीत. व्हाट्सअप वर पावती पाठवण्यात येईल असे सांगून, त्यांना पावती दिली गेली नाही. मग दानपेटीत ,सर्वसामान्य माणूस जी रक्कम टाकतो ,त्याचा काय हिशोब असेल, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. लाखोच्या संख्येने, सर्वसामान्य माणसाने अयोध्येत जाऊन, श्रीरामाचे दर्शन घेतले आहे. या लुटीवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्या प्रत्येकाला, विरोधी पक्षाचे लोक असल्याचे समजून, तुम्ही राम मंदिरा करता काय केले, असा प्रश्न, देणगी चोरांकडून विचारला जात आहे. सोशल मीडियावर, राहुल गांधी, अखिलेश यादव आदींनी,राम मंदिराच्या उभारणीत काय योगदान दिले, असा प्रश्न विचारला जात आहे.

      आपण राम मंदिरात चोरी केली आहे आणि चोरी करताना पकडले गेलो आहोत, याची जाणीव भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना झाल्यामुळे, त्यांची अवस्था साप सुंगल्यागत झालेली आहे. नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांनी, या विषयावर सोयीस्कर मौन बाळगले आहे. योगी आदित्यनाथ मात्र दररोज वेगवेगळी विधान करत आहेत. आपल्या बोलण्यात, ते कधी बाबरला सुद्धा घेऊन येतात. राम मंदिरात येणाऱ्या देणग्यांमध्ये घोटाळा झाल्याचा वर्तमान, समोर उभा असताना, यावेळी बाबर, गजनी, औरंगजेब यांची नावे घेऊन, जनतेला इतिहासात घेऊन जाण्याचा, केविलवाना प्रयत्न होत आहे.

       आजच्या संगणक युगात, जिथे पावला पावलावर सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत. त्या ठिकाणी, गेल्या दोन वर्षात, राम मंदिरात झालेल्या घोटाळ्याचा हिशोब लागत नाही. तिथे दोन - चारशे वर्षांपूर्वी, मुस्लिम शासकाने केलेल्या लुटीचा हिशोब लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. आजच्या परिस्थितीत, राम मंदिरातील चोरीवरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळावे म्हणून, सत्ताधाऱ्यांकडून कितीही प्रयत्न झाला,तरी सुद्धा, चोरी मंदिरात झाली असली, तरी डाका मात्र आपल्या श्रद्धेवर पडलेला आहे, याची विस्मरण, कोणत्याही भाविकांनी होऊ देऊ नये. सरकारला कशाही प्रकारे, या घोटाळ्यातून बाहेर पडण्याची घाई झाली आहे. घोटाळ्यावर पांघरून घालणे अशक्य असल्याचे दिसून आल्यामुळे, काही निम्नस्तरातील कर्मचाऱ्यांना अटक करून, आपण ॲक्शन मोडमध्ये आलेलो आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

         जनतेच्या समाधानाकरता, देणगी चोर पाताळात जाऊन लपले असतील, तर तिथून सुद्धा त्यांना उचलून आणले जाईल, अशा प्रकारचे आश्वासन दिले जात आहे. परंतु समोर दिसणाऱ्या चंपक रायला, जिथे अटक केली जात नाही, तिथे पाताळात जाऊन गुन्हेगार पकडण्याची गोष्टच सोडा. राम मंदिर भारतीय जनता पक्षाने बनवले आहे, मग या पक्षानेच ते लुटले, तर विरोधकांना मिरच्या का झोंबाव्यात,असे मूर्खासारखे प्रश्न, सोशल मीडियावर विचारण्यात येत आहे.

         भारताला काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवून दिले, मग 60 वर्षात काँग्रेसने देशाला लुटले,असे म्हणण्याचा नरेंद्र मोदी यांना अधिकार आहे काय, असा  प्रतिप्रश्न विचारला जाऊ शकतो. परंतु स्वातंत्र्यानंतर 60 वर्षात काँग्रेसने, ज्याप्रमाणे देशाची उभारणी केली. त्या उभारणीतील एक एक भाग, आपल्या उद्योगपती मित्रांना विकून, नरेंद्र मोदी आपला कार्यकाळ पूर्ण करत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. ज्यांनी भारताच्या स्वतंत्र लढ्यात योगदान दिले नाही, त्यांना भारतावर राज्य करण्याचा अधिकार नाही, अशा प्रकारचा युक्तिवाद देखील केला जाऊ शकतो. परंतु काँग्रेस या विचारसरणीचा पक्ष नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच सरदार वल्लभभाई पटेल यांनी, राष्ट्रीय  स्वयंसेवक संघावर घातलेली बंदी, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उठवायला लावली होती, हा इतिहास आहे. 

       "तळे राखील,तो पाणी चाखील"अशी म्हण, आपल्याकडे प्रचलित आहे. परंतु तळ्याचे राखण करत असताना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, संपूर्ण तळेच कोरडे करून ठेवले आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे, साधूच्या वेषात येऊन, रावणाने सीतेचे हरण केले होते. इथे रामभक्ताचे रूप घेऊन हजारो रावण, रामाच्या नावाखाली, आपली दुकानदारी चालवत आहेत.

        कृषी बिल, नोटबंदी, लॉकडाउन, पुलवामा, पहेलगाम, निवडणूक रोखे, निवडणूक चोरी, आपल्या उद्योगपती मित्रांना विकलेले, सरकारी उपक्रम, आंतरराष्ट्रीय पातळीवर, इतर राष्ट्रांची सलोख्याचे संबंध ठेवण्यात आलेले अपयश, वाढती महागाई, सर्वोच्च स्तराला पोहोचलेली बेरोजगारी, प्रेस फ्रीडमच्या बाबतीत आपला घसरता इंडेक्स, भुकमरीच्या बाबतीतला, आपला घसरता इंडेक्स, डॉलरच्या तुलनेत रसातळाला गेलेला रुपया, या सर्व गोष्टी, मोदी सरकारच्या अपयशाचे जिवंत उदाहरण असताना,

       केवळ हिंदूंचे रक्षण करणारे सरकार आहे असे समजून, भारतीय जनतेने, या सरकारच्या अपयशाकडे दुर्लक्ष केले. परंतु राम मंदिराच्या व्यवहारात घोटाळा होऊ शकतो, तेथील पैशाचा अपहर होऊ शकतो, असा कोणत्याही भारतीय नागरिकानी, स्वप्नात देखील विचार केला नसेल. राम मंदिरातील घोटाळ्यामुळे, भारतीय जनता पक्षाचा, खरा चेहरा जनतेपुढे आलेला आहे. हिंदूंनी बांधलेल्या मंदिरात, हिंदूंनी दिलेल्या देणगीत, हिंदूंनीच अफरातफर केली, तर इतरांना मिरच्या झोंबण्याचे कारण काय, असा प्रश्न अतिशय निर्लज्जपणे विचारला जात आहे. यांचे हे ढोंगी हिंदुत्व, केवळ मंदिरात झालेल्या देणगीतील अफरातफरीपुरताच मर्यादित आहे, अशातला भाग नाही.तर कोणत्याही हिंदू मुलीवर अथवा महिलेवर बलात्कार झाला असेल, तर पेटून उठण्याकरता, यांना बलात्कार करणारा, हा मुसलमानाच असावा लागतो. हिंदू माणसाने, हिंदू मुलीवर केलेला बलात्कार देखील यांना क्षम्य वाटत असेल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बलात्कारी राम रहीम आणि आसाराम यांची कृष्णकृत्ये ज्यावेळी जगापुढे आलीत, त्यावेळी देखील, तुम्हाला फक्त हिंदू संतांनाच टार्गेट करता येते का, असा प्रश्न विचारला गेला होता. इतर धर्मामध्ये काय चालतं, याचा विचार करत बसण्यापेक्षा, आपल्या धर्माचं बरबटलेपण सावरणं जास्त महत्त्वाच आहे, याची जाणीव, यांना होतच नाही. ज्यांनी हा धर्म बरबटवला आहे, तेच धर्माचे ठेकेदार होऊन बसले असल्यामुळे, ते सांगतील तोच धर्म, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

       अयोध्येतील राम मंदिराच्या शिलान्यासा पासून तर मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापर्यंतच्या, सर्व कार्यक्रमात नरेंद्र मोदी अग्रेसर होते. अर्धवट बांधकाम झालेल्या मंदिराचे उद्घाटन करू नका, या शंकराचार्याच्या निवेदनाला, केराची टोपली दाखवून, मंदिराची उद्घाटन करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना, राम मंदिरात झालेल्या भ्रष्ट व्यवहारापासून, आपले हात झटकता येईल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ब्रजभूषण सिंग याच्यानंतर, आता धीरेंद्र शास्त्री यांनी देखील, राम मंदिरातील भ्रष्टाचाऱ्यांची नावे उघड केल्यास, आपल्याला संपवले जाईल, असे विधान केले आहे. त्यावरून किती मोठ्या आसामींचा, या भ्रष्टाचारात सहभाग आहे, हे सहज लक्षात येईल .आमचा पैसा आम्हीच खाल्ला, त्याचे तुम्हाला काय? अशा प्रकारच्या मूर्खपणाची बडबड, सोशल मीडियावर करणारे कितीही नेते असले, तरी राम मंदिरातील चोरीच्या उत्तरदायित्वा करता, भारतीय जनतेच्या नजरा, नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष, आणि राष्ट्रीय स्वस्थ संघ यांच्यावर टिकून आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. 

• पंकज वैद्य, वरिष्ठ पत्रकार, अमरावती 
9823014040