वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची ठाण्यात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची ठाण्यात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

नाशिक : २१ फेब्रुवारी : नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाती  अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडुन घेतल्याची खळबळजनक घटना आज सकाळी घडली. त्यांनी ही आत्महत्या का केली हे एक कोडेच समजले जात आहे.

     या घटनेने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. अंबड पोलीस ठाण्यात त्यांच्या केबिनमध्ये त्यांनी सर्विस पिस्टलने  डोक्यात गोळी मारून घेतली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. एवढ्या मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे पोलीस दलात देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.