छत्रपती संभाजीनगरात पोलिसांची मोठी कारवाई, कुंटनखान्यावर धाड

छत्रपती संभाजीनगर 5 जून : छत्रपती संभाजीनगर 5 जून : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने (AHTU) झाल्टा, बिड बायपास येथील हॉटेल अंबिका लॉजिंग अँड बोर्डिंगवर ४ जुलै २०२५ रोजी छापा टाकून अवैध देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत ४ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, हॉटेल मालक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे आणि सहायक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांच्या पथकाने हॉटेलवर सापळा रचला. पथकाने एका डमी ग्राहकाला हॉटेलमध्ये पाठवले. हॉटेल मॅनेजर सुभाष फकिरा राठोड (वय ४९, रा. अमराई, छ. संभाजीनगर) याने डमी ग्राहकाकडून १,००० रुपये घेऊन त्याला खोली क्रमांक १०६ मध्ये पाठवले आणि तिथे एका महिलेला पाठवण्याचे कबूल केले. यावरून पथकाने छापा टाकला आणि त्या महिलेची सुटका केली. तसेच, हॉटेलच्या इतर खोल्यांमधून आणखी ३ पीडित महिलांना सोडवण्यात आले.
पोलिसांच्या तपासात असे समोर आले की, हॉटेल मालक विश्वास शिंदे (वय ५१, रा. झाल्टा, छ. संभाजीनगर) आणि मॅनेजर सुभाष राठोड हे गरीब आणि अशिक्षित महिलांचा आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने देहविक्री करवत होते. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (कलम ३, ४, ५) चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, ५७,९९० रुपयांचा मुद्देमाल, मोबाइल फोन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे, सहायक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल नरवडे, विनोद भालेराव आणि पोलीस कर्मचारी दिलीप साळवे, कपिल बनकर, ईशाद पठाण, सपना चरवंडे, भाग्यश्री चव्हाण, संदीप थोरात यांनी यशस्वीपणे पार पाडली.
पोलिसांनी या कारवाईद्वारे अवैध देहविक्री रॅकेटवर मोठा प्रहार केला असून, पीडित महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने (AHTU) झाल्टा, बिड बायपास येथील हॉटेल अंबिका लॉजिंग अँड बोर्डिंगवर ४ जुलै २०२५ रोजी छापा टाकून अवैध देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत ४ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, हॉटेल मालक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल झाला आहे.