बायको व पुतण्याचा गोळ्या घालून खून करून ACP ची आत्महत्या

बायको व पुतण्याचा गोळ्या घालून खून करून  ACP ची आत्महत्या

पुणे, २४ जुलै : अमरावती पोलीस आयुक्तालयात राजापेठ विभागात नोकरीवर असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) भरत गायकवाड यांनी पुण्यातील चतु:शृंगी परिसरात त्यांचे स्वतःचे घरी पत्नी मोनी आणि पुतण्या दीपक यांचा सर्विस पिस्तोलनी गोळ्या घालून खून केला आणि त्याच पिस्तोलनी स्वतःला गोळी घालून आत्महत्या केली. ही घटना आज पहाटे 04:00 वाजताची आहे.

    एसीपी भरत गायकवाड हे मागील दोन वर्षापासून अमरावती शहरात राजापेठ विभाग येथे कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ते सरकारी कामाने मुंबई येथे मंत्रालयात गेलेले होते. त्यासोबतच पुणे येथे आपल्या घरी जाण्यासाठी त्यांनी दोन दिवसाची सुट्टी पण घेतली होती. 

     मिळालेल्या माहितीनुसार एसीपी गायकवाड यांनी पत्नी मोना यांच्याशी लव्ह मॅरेज केलेला होता. पत्नी मोना ह्या सिंधी समाजाच्या होत्या. त्यांचा पुण्यात कपड्याचा मोठा कारभार होता. एसीपी गायकवाड हे मृदू स्वभावाचे व निर्व्यसनी होते.

      कोणत्या कारणाने त्यांनी हत्या केली व आत्महत्या केली हे अध्याप तरी निष्पन्न झालेले नाही. याबाबतचा तपास पुणे पोलीस करीत आहेत.