बजरंग चौकात सुरू झाली 'इंजिनिअर वडेवाला'ची नवीन शाखा

बजरंग चौकात सुरू झाली 'इंजिनिअर वडेवाला'ची नवीन शाखा

औरंगाबाद, २६ जानेवारी: पुण्यातील प्रसिद्ध 'इंजिनिअर वडेवाला' या फूड ब्रँडची शाखा आजपासून औरंगाबादच्या बजरंग चौकात सुरू झाली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी माजी नगरसेवक मकरंद कुलकर्णी, समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव रियाज देशमुख, समाजसेवक मोहम्मद हिशाम उस्मानी, समदपाशा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

         ही फ्रँचायझी प्रसिद्ध जीम ट्रेनर सुमेर वाहेद देशमुख यांनी घेतली असून, त्यांच्या प्रयत्नांनी औरंगाबादकरांसाठी ही शाखा उघडण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी वडापाव, चहा व नाश्त्याचा आनंद घेण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. वडापावसह पार्सल सेवेसाठीही मोठ्या प्रमाणावर मागणी होती.

          या उद्घाटन सोहळ्यात शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये भाजपाचे पदाधिकारी अतिक पठाण, साजिद जहागिरदार, अ‍ॅड. माजिद पटेल, साजिद पटेल सर, श्रीमती छाया दास, जाकेर देशमुख, वारीस देशमुख, मोहसीन देशमुख, जुबेर देशमुख, अनसार देशमुख, सिद्दीक पटेल, सलिम पटेल, वसिम देशमुख, अबरार देशमुख, शेख मुजाहिद, शेख मोसेफ, असलम शेख, एल्विन दास, कॅल्विन दास, इरफान पटेल, समिक्षा, स्टेफी, मयूर, अंजली आदींचा समावेश होता.

         'इंजिनिअर वडेवाला' ही पुण्यातून सुरू झालेली फूड चेन आहे, जी दर्जेदार वडापाव आणि चहा यासाठी ओळखली जाते. त्यांच्या खाद्यपदार्थांना ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबादमधील बजरंग चौक, नेहरू उद्यानासमोर उघडलेली ही शाखा, चवदार आणि दर्जेदार खाद्यपदार्थांसाठी स्थानिकांसाठी एक आकर्षण ठरणार आहे.

            उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी सुमेर वाहेद देशमुख यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आणि ग्राहकांकडूनही शाखेला चांगला प्रतिसाद मिळाला. या शाखेमुळे औरंगाबादकरांना उत्कृष्ट वडापाव आणि नाश्त्याचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे.