डोक्यात गोळी घालून लघुउद्योजकाचा खून.....

डोक्यात गोळी घालून लघुउद्योजकाचा खून.....
मृतक सचिन नरोडे

वाळूज  : येथील साजापूर, क्रांतिनगरमधील बालाजीनगर येथे एका लघू उद्योजकाची डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली. ही घटना रविवारी  रात्री ०८:०० वाजेच्या सुमारास घडली. सचिन साहेबराव नरोडे (वय ३५) असे मृतकाचे नाव आहे.

       नरोडे हे मूळ शिल्लेगाव येथील रहिवासी आहेत. ते साजापूर येथे आई, वडील आणि मुलगी सोबत राहात होते. त्यांचा वडगाव येथे स्वयंपाकाची शेगडी बनविण्याचा लघुउद्योग आहे.

     रविवारी रात्री ०८:०० वाजेच्या सुमारास नरोडे यांच्या मोबाइलवर एका इसमाचा कॉल आला. त्याइसमाने त्यांना घराबाहेर बोलावले. यावेळी वीजपुरवठा खंडित झालेला होता. नरोडे घराबाहेर पडल्यानंतर घरापासून १०० फूट अंतर चालत गेल्यावर मोकळ्या मैदानात संबंधित व्यक्तीने नरोडे यांच्या डोक्यात पिस्तूलमधून गोळी झाडली.

      नरोडे खाली कोसळताच मारेकऱ्याने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, गोळी झाडल्याचा मोठा आवाज आला. तो ऐकून परिसरातील नागरिक घराबाहेर आले. त्यांना नरोडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. घटनास्थळावरच नरोडे यांचा मृत्यू झाला.

     वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, संदीप शिंदे यांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. रात्री उशिरा पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलिस उपायुक्त नितीन बगाटे व पोलिस उपायुक्त महेंद्र देशमुख यांनीही घटनास्थळी भेट दिली.