“तोहफतुल हदीस” पुस्तकाचे उद्या प्रकाशन; समाजजागृतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल

“तोहफतुल हदीस” पुस्तकाचे उद्या प्रकाशन; समाजजागृतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल

औरंगाबाद, १३ एप्रिल : समाजात नैतिक मूल्ये, मानवता आणि शांततेचा संदेश पोहोचवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दि. १४ एप्रिल २०२६ रोजी मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे क़ारी अब्दुल्ला खान मार्कोनी यांच्या “तोहफतुल हदीस” या तिसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सकाळी १०:०० वाजता सुरू होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

     या पुस्तकाचे प्रकाशन शेख -उल-हदीस हज़रत मौलाना मोहम्मद नसीमुद्दीन मिफ्ताही यांच्या हस्ते होणार आहे, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. मख़दूम फारुक़ी भूषवणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना डॉ. सदरुलहसन नदवी मदनी, मौलाना डॉ. अब्दुल रशीद नदवी मदनी, आर्किटेक्ट अरशद अहमद, मेजर सईदा फरासत आणि डॉ. शाझिया नहरी उपस्थित राहणार आहेत. तसेच डॉ. अनवरुल्लाह कादरी, सय्यद शाहिद हमीद, डॉ. इकबाल मिन्ने आणि डॉ. अझहर सिद्दीक़ी यांचीही उपस्थिती राहणार आहे.

      क़ारी अब्दुल्ला खान मार्कोनी हे "इल्मुल कुरआन व हदीस अकॅडमी" चे प्रमुख असून ते औरंगाबादसह विविध शहरांमध्ये कुरआनचे भाषांतर शिकवण्याचे कार्य करत आहेत. त्यांनी आता हदीस शिक्षणालाही सुरुवात केली आहे. “परलोकात यश मिळवण्यासाठी कुरआन आणि हदीस दोन्हींचे ज्ञान आवश्यक आहे,” या विचारातून त्यांनी “तुफतुल हदीस” हे पुस्तक तयार केले आहे.

      या पुस्तकामध्ये मानवता, परस्पर प्रेम, शांतता, योग्य व्यवहार, इबादत, शेजाऱ्यांचे हक्क, तसेच मत्सर व गैरसमज दूर करण्यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले आहे. हलाल-हराम याची योग्य जाणीव करून देत समाजात बंधुभाव वाढवण्याचा आणि देशाच्या प्रगतीत सकारात्मक योगदान देण्याचा संदेश या पुस्तकातून दिला आहे.

      हा कार्यक्रम केवळ पुस्तक प्रकाशनाचा नसून, समाजाला योग्य दिशा देणारा एक ज्ञानोत्सव आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून ज्ञानाचा लाभ घ्यावा आणि “तोहफतुल हदीस” हे पुस्तक वाचून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवावा, असे आवाहन उन्नती लॉन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत या पुस्तकाचे लेखक क़ारी अब्दुल्ला खान मार्कोनी, शेख -उल-हदीस हज़रत मौलाना मोहम्मद नसीमुद्दीन मिफ्ताही, शम्सुल हसन यांचे कडून   करण्यात आले आहे.