सोशल मीडियावरील असभ्य भाषा रोखण्यासाठी केंद्र सरकार बनवणार नियम
नवी दिल्ली : सोशल मीडियावरील वाढती असभ्य भाषा रोखण्यासाठी केंद्र सरकार कडक धोरण आखण्याच्या तयारीत आहे. सोशल मीडिया प्लॅंटफॉर्मवरील अश्लील, असभ्य, द्वेष्युक्त शब्दांच्या वापरावर बंदी घालण्यासाठी कायद्यात बदल केला जाईल, असे केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात स्पष्ट केले.
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले की, सोशल मीडियाचे नियमन करणे हा धोरणात्मक निर्णय आहे. सरकार योग्य नियम लागू करेल, अहवाल पाहिल्यानंतर कोर्ट म्हणाले, न्यायालयाच्या चिंता भविष्यातील नियमनामध्ये समाविष्ट केल्या जातील व तातडीने लागू केल्या जातील, असे आश्वासन सरकारने दिले आहे.
मार्च २०२३ मध्ये न्या. सुवर्णकांता शर्मा यांच्या खंडपीठाने 'कॉलेज रोमान्स' मधील अश्लील भाषेच्या वापरावर कड़क शब्दांत ताशेरे ओढले होते.