महावितरणचे दोन अधिकारी अँटी करप्शन च्या सापळ्यात रंगेहात अडकले...

महावितरणचे दोन अधिकारी अँटी करप्शन च्या सापळ्यात रंगेहात अडकले...

जालना, 27 फेब्रुवारी : घरगुती वीज ग्राहकाकडून 3000 रुपयाची लाच घेताना जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातर्गत राणी ऊचेगाव येथील महावितरण कार्यालयातील  वरिष्ठ तंत्रज्ञ अधिकारी आणि त्याचा सोबती कंत्राटी टेक्निशियन ला तीन हजार रुपयाची लाच घेताना जालना अँटीकरप्शनचे अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात पकडले.


    अँटी करप्शन खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार 49 वर्षीय तक्रारदार यांनी त्यांचे घरातील घरगुती वापराचे विद्युत बिल न भरल्याने त्यांचे विद्युत कनेक्शन महावितरण कार्यालयाकडून खंडित करण्यात आले होते. विद्युत मीटर पूर्ववत बसविण्यासाठी राणी उचेगाव महावितरण कार्यालयातील लाचखोर वरिष्ठ तंत्रज्ञ सुरेश प्रकाश गुंजाळ याने पंचांसमक्ष 3000 रुपये लाचेची मागणी केली. लाचेची ही रक्कम या लाचखोर वरिष्ठ तंत्रज्ञासाठी कंत्राटी टेक्निशियन बालाजी भिकाजी शिंगटे याने पंचासमक्ष राणी उचेगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र समोर स्वीकारली. या दोघांना अँटी करप्शन ब्युरो चे अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.


      दोन्ही लाचखोरांचे विरुद्ध प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऐक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई सध्या सुरू आहे.


      सदरची कारवाई औरंगाबाद अँटी करप्शन विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे आणि अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांचे मार्गदर्शनाखाली जालना अँटीकरप्शन ब्युरोचे पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर यांनी त्यांचे सहकारी पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर मस्के, जावेद शेख, गणेश बुजाडे, कृष्णा देठे, गजानन कांबळे, शिवाजी जमधडे, गजानन कांबळे, प्रवीण खंदारे यांचे सह यशस्वी कारवाई केली.