डस्टबिनऐवजी बाटली – पर्यावरण रक्षणाची नवी दिशा

डस्टबिनऐवजी बाटली – पर्यावरण रक्षणाची नवी दिशा

           प्रत्येक घरात दररोज किमान 1 ते 10 प्लास्टिक पिशव्या येतात (जसे की, तेलाची/तुपाची पॅकेट्स, दुधाची पिशवी, किराणा सामानाच्या पिशवी, शाम्पू/साबण/औषध/खेळणी यांचे प्लास्टिकचे पॅकिंग मटेरियल  खाद्यपदार्थांच्या लहानमोठ्या पिशव्या, इत्यादी). आपण या सर्व पिशव्या/पॅकेट्स/पॅकिंग दररोज डस्टबिनऐवजी रिकाम्या थंड पेयांच्या बाटल्यांमध्ये टाकाव्यात, एकदा ही  बाटली भरली  की योग्य झाकण असलेल्या डस्टबिनमध्ये टाकावे. असे केल्याने प्राणी विखुरलेले प्लास्टिक खाणार नाहीत, ज्यामुळे प्लास्टिक कचरा आणि प्लास्टिकच्या बाटल्यांची योग्य विल्हेवाट लावली जाईल. ग्रामपंचायत/नगरपालिका/नगर परिषद व महानगरपालिकेला कचरा गोळा करणे आणि कचऱ्याचे वर्गीकरण करणेदेखील सहज, सोपे व सोयीचे होईल.

          प्रत्येक घराने ही गरज ओळखून हे उत्तम कार्य सुरू करावे अशी कळकळीची  नम्र विनंती आहे. हा सहज, सोपा आणि उत्तम पर्याय नित्तनितामाने अंमलात आणून घर व परिसर स्वच्छ ठेवण्याचे अवघड कार्य सोय पद्धतीने कमी वेळेत उरकण्याची किमया साधावी. लोकांनी या उपक्रमांत प्रतिसाद देऊन काटेकोरपणे अंमलबजावणीची सवय स्वतःसह इतरांनाही लावावी. धन्यवाद.

-  द्वारा : जनहितार्थ न्यूज नेटवर्क