१ कोटी लाच स्विकारतांना इंजिनिअर एसीबीच्या जाळ्यात
अहमदनगर : बदलून गेलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी आणि स्वत:साठीऔ औरंगाबादच्याठेकेदाराकडून तब्बल एक कोटी रुपयांची लाच स्वीकारताना एमआयडीसी चे इंजिनीयरला नाशिकच्या अँटी करप्शन ब्युरो चे पथकाने शुक्रवारीरा त्री रंगेहाथ पकडले. लाचेची रक्कममि ळताच 'साहेब पाकीट मिळाले, तुमचाहि स्सा कुठे पाठवू?' असा फोन या लाचखोर इंजिनीयरने पंचासमक्षच केला. एसीबीच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद येथील ठेकेदार अरूण गुलबराव मापारी यांनी त्यांच्या मापारी इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंपनीमार्फत
अहमदनगरच्या एमआयडीसी वसाहतीत एक हजार एम एम व्यासाच्या लोखंडी पाइपलाइनचे काम केले होते. त्या कामाच्या बिलापोटी १ कोटी ५७ हजार
८५ रुपये आणि इतर कामाचे असे २ कोटी ६६ लाख ९९ हजार रुपयांचे बिल येणे बाकी होते.
हे बिल मिळवण्यासाठी मागील तारखेचे बिल तयार करून त्यावर तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाध याच्या स्वाक्षऱ्या मिळवून बिल मंजूर करून देतो, असे सांगत अहमदनगर एमआयडीसी मध्ये नियुक्तीला असलेला लाचखोर असिस्टंट इंजिनियर वर्ग-२अमित किशोर गायकवाड याने आपल्यासाठी आणि वाघ याच्यासाठी एक कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
कंत्राटदार मापारी यांनी याबाबत
एसीबीकडे तक्रार केल्यानंतर नाशिक एसीबीच्या पथकाने सापळा रचला. शुक्रवारी, ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी शेंडी बायपासजवळ लाचेची रक्कम
घेण्याचे ठरले होते. ठरल्यानुसार गायकवाड वाहनातून तेथे आला. एसीबीच्या पथकाने कंत्राटदार मापारीकड़े ५० हजार रुपयांच्या खऱ्या नोटा आणि इतर खेळण्यातील नोटा अशा स्वसरुपात एक कोटी रुपये वाटावेत असे बंडल तयार करून दिले. ठरल्याप्रमाणे अमित गायकवाडने शेंडी बायपासजवळ अहमदनगर-औरंगाबाद रोडलगतच्या मोकळ्या पटांगणात इनोव्हा गाडीतून येऊन पंचासमक्षच लाचेची रक्कम
स्वीकारली.
या प्रकरणी अहमदनगर एमआयडीसीमध्ये नियुक्तीला असलेला लाचखोर असिस्टंट इंजिनियर अमित किशोर गायकवाड (वय-३२, रा. नागपूर , मूळ राहणार चिंचोली, ता. राहुरी) याला एसीबीने अटक केली आहे. याच ठिकाणी पूर्वी नियुक्तीला असलेला उपविभागीय अभियंता गणेश वाघ (रा.अहमदनगर) याच्याविरोधातही एसीबीने गुन्हा दाखल केला आहे.
साहेब पाकिट मिळाले, तुमचा हिस्सा कुठे पाठवू?
लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर अमित
गायकवाडने तेथूनच आपल्या मोबाइलवरून गणेश वाघ याला फोन केला. लाचेचेच्या रकमेच्या वाटपावरून
त्यांचे संभाषण सुरू झाले. पैसे मिळाले आहेत. तुमच्या हिस्स्याची रक्कम कुठे पाठवू? असे गायकवाडने वाघला विचारले. त्यावर वाघ याने काय केले
त्यांनी? अर्शी विचारणा केली. त्यावर गायकवाडने यांनी दिले तर ते एकच पाकिट, असे उत्तर दिले. गायकवाडच्या या उत्तरावर ' राहू दे तुझ्याकडेच. बोलतो मी तुला. ते तुलाच एका ठिकाणी पोहोचवायचे आहेत. कोठे ते सांगतो मी तुला नंतर, सध्या ठेव तुझ्या सेफ कस्टडीत', असे गणेश वाध याने अमित गायकवाडला सांगितले.
गायकवाड आणि वाघ यांच्यातील हे संभाषण पंचासमक्षच झाले. त्यामुळे या गुन्हद्यात गणेश वाघचा सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहें. या गुन्ह्मात गायकवाड आणि वाघ यांच्या सोबत आणखी काही आरोपी असण्याची शक्यता असल्यामुळे पलिस आता त्या दिशेने तपास करत आहेित.