हरभरा पिकाला भाव मिळाला नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या..
तेल्हारा, 1मार्च (प्रतिनिधी मोतेबर देशमुख) : तेल्हारा तालुक्यातील मौजे दहिगाव येथील तरुण शेतकरी राजेश रामलाल खोंदिल (वय 45 वर्षे) ह्या शेतकऱ्यने चिंचेच्या झाळाला दोराच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केलीी.
राजेश हा अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा, कोणाच्याही हाकेला धावून जाणारा, मात्र काल शेतमाल विकुन आला तेव्हा पासून तो रात्री उशिरापर्यंत घरीच पोचलाच नाही. त्यामुळे त्यांचे घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. पूर्ण रात्रभर शोधूनही कुठेही आढळून आला नाही. मात्र आज सकाळी गावातील एका तरुणाने चिंचेच्या झाडाला फास घेऊन अडकलेल्या अवस्थेत पाहताच त्याच्या घरच्यांना सांगितले. तेव्हा मात्र सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. सर्व गाव दुःख व्यक्त करत होते.
घटनाक्रम असा की दहिगाव येथील शेतकरी राजेश रामलाल खोंदिल हा अल्पभूधारक शेतकरी असून ह्यांनी चालू वर्षात हरभरा पीक पेरले व आपल्या कडे असलेल्या देण्यासाठी त्यांनी काल पिकवला हरभरा विकून लोकांची देणी फेडली. असा हा इमानदार शेतकरी काबाड कष्ट करणारा, राबराब राबून आपल्या परिवाराचा उदर निर्वाह करत आपले जीवन जगत होता. मात्र शेती पिकूनही शेत मालाला भाव मिळत नाही. त्यात मुलांचे शिक्षण, यामुळे कंटाळा आलेल्या शेतकरी राजाला दुसरा पर्यायच नाही का ?
राजेश ला एकूण तीन मुली. सर्वांचे शिक्षण, त्यांचे संगोपन करण्यात तो मग्न होता. मात्र दरवर्षी शेतमालाला भाव नसल्याने हतबल होऊन शेवटी टोकाची भूमिका घेत आपली जीवन यात्रा संपवली.
तेल्हारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून घटनास्थळी तेल्हारा पोलीस पोचले आहेत. पुढील तपास सुरू आहे.