दुष्काळ परिस्थिती लक्षात घेता कन्नड शहरातील बंद हापसे विद्युत पंप तात्काळ चालू करा : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मागणी
कन्नड, ८ डिसेंबर (प्रतिनिधी- मुजीब खान) : दुष्काळ परिस्थिती लक्षात घेता कन्नड शहरातील बंद असलेले विद्युत पंप तसेच बंद पडलेले हापसे तात्काळ चालू करण्यात यावे यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपशहर प्रमुख चंद्रकांत लाडे यांनी मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे यांना निवेदन सादर केले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणामध्ये पाणीसाठा कमी असल्यामुळे दुष्काळ परिस्थितीचा सामना कन्नड शहरातील नागरिकांना करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. करिता कन्नड शहरांमध्ये बंद अवस्थेत असलेले विद्युत पंप तसेच तुटलेले हापसे यांना दुरुस्त करून काही ठिकाणी बोर मारून इलेक्ट्रिक पंप बसवून पाण्याच्या टाकीची व्यवस्था करण्यात यावी.
जेणेकरून कन्नड शहरांमध्ये जनतेची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवण्यासाठी कन्नड शहरातील बंद अवस्थेत असलेले हापसे तसेच इलेक्ट्रिक पंप यांना तात्काळ चालू करून कन्नड शहरात नागरिकांना आठ ते दहा दिवसांवर पाणी मिळत असल्याने नागरिक पाण्यासाठी भंटकतीची वेळ येणार नाही.
याकरिता तात्काळ बंद असलेले हापसे तसेच बंद असलेले इलेक्ट्रिक पंप चालू करण्यात यावे. या प्रश्ननी कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपशहर प्रमुख चंद्रकांत लाडे, गोविंद लाडे यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांना दिला आहे