गंगापूर नगरपरिषदेच्या चमकदार क्रीडा कामगिरीने जिल्हा महोत्सवात मारली बाजी

वैजापूर : नगरविकास विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2024-2025, दिनांक 7 जानेवारी ते 9 जानेवारी 2025 दरम्यान वैजापूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवात गंगापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध क्रीडा प्रकारांमध्ये चमकदार यश संपादन केले.
गंगापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी केली. कबड्डी या सांघिक खेळात प्रथम क्रमांक पटकावून चमकदार विजय मिळवला. तसेच, रस्सीखेच आणि व्हॉलीबॉल या खेळांमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून आपले कौशल्य दाखवले.
डॉ. स्वप्नील कल्याणराव लघाने यांनी बॅडमिंटन एकेरीत प्रथम क्रमांक व दुहेरीत तृतीय क्रमांक पटकावला.
लोपामुद्रा चव्हाण यांनी भालाफेक प्रकारात प्रथम क्रमांक, 100 मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक, लांब उडी व थाळीफेक या दोन्ही प्रकारांमध्ये तृतीय क्रमांक मिळवला.
संध्या दळवी यांनी 400 मीटर धावण्यात प्रथम तर 200 मीटर धावण्यात तृतीय क्रमांक मिळवला.
सुधीर अशोक खाजेकर यांनी भालाफेक प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला.
प्रवीण किसन बर्फे यांनी थाळीफेक प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला.
400 मीटर रिलेमध्ये ज्ञानेश्वर दिघोळे, मयूर गावित, भानुदास खाजेकर आणि पवन खाजेकर यांनी द्वितीय क्रमांक मिळवून चषक आपल्या नावे केला.
यशस्वी खेळाडूंना सुवर्ण, रौप्य, आणि कांस्य पदकांनी सन्मानित करण्यात आले.
गंगापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. पल्लवी प्रल्हाद अंभोरे यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करत विभागीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. कर्मचाऱ्यांच्या या यशामुळे गंगापूर नगरपरिषदेच्या क्रीडा परंपरेला नवी उंची प्राप्त झाली आहे.