मुस्लिम कब्रस्तानच्या जागेवर हिंदूंचे अतिक्रमण : मुस्लिम समाजाकडून अतिक्रम हटवण्याची मागणी

मुस्लिम कब्रस्तानच्या जागेवर हिंदूंचे अतिक्रमण : मुस्लिम समाजाकडून अतिक्रम हटवण्याची मागणी

कन्नड, ८ डिसेंबर (प्रतिनिधी- मुजीब खान)  :  कन्नड तालुक्यातील शिरसगाव येथील मुस्लिम कब्रस्तानच्या सर्व क्र २२७ च्या क्षेत्र एक एकर २५ गुंठे जमीन असून या जमिनीत गोकुळसिंग तोताराम नारडे व मदन शंकर सिंग बेडवाल यांनी अतिक्रम केल्याची तक्रार तहसीलदार यांच्याकडे मुस्लिम समाजाचे वतीने लेखी स्वरुपात करण्यात आली. आणि संबंधितावर कायदेशीर कारवाई करून सदरील जागेवरील सुरू असलेले बांधकाम त्वरित  थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.

       तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कन्नड तालुक्यातील शिरसगाव येथील सरकारी जागा सर्वे क्र २२७ ही मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानासाठी  एक एकर २५ गुंठे जमिनीच्या सर्वे नंबर २२७ च्या सातबारे उल्लेख आहेत.  सदरील शिरस गावातील मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदरील कब्रस्तानच्या दक्षिण दिशेने गोकुळ सिंग नारडे व मदन बेडवाल हे दोघे संगणमत करून कन्नड वैजापूर रोड लगत असलेल्या कब्रस्तानच्या जमिनीत अतिक्रम करून काळे बांधण्याच्या प्रयत्नात आहेत.  जमीन ही शासनाकडून मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानासाठी दिलेल्या असून त्यांचा फेर क्रमांक ९३२ असून ७/ १२ मध्ये त्याची स्पष्टपणे नोंद आहे. त्यामुळे तहसीलदारांनी सदरील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानच्या जमिनीमध्ये होत असलेल्या अतिक्रम बांधकाम त्वरित थांबवावे, संबंधिता विरोधात कायदेशीर कारवाई करावी. कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होईल असे निवेदनात म्हटले आहे. 

      या निवेदनाच्या प्रति जिल्हा मॅजेस्ट्रेट, ग्रामीण पोलीस अधीक्षक, उप मंडळाधिकारी, उपमंडळ पोलिस अधिकारी आदिनाथ देण्यात आले आहे