आज सकाळी जरांगे पाटलाला मूर्ख बनवण्यात आले की ते बनले?

आज सकाळी जरांगे पाटलाला मूर्ख बनवण्यात आले की ते बनले?
Jarange Patil at Bhamberi

जालना : रविवारी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विरुद्ध गरळ ओकली. आणि तावातावाने अंतरवाली सराटी येथून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईतील  सागर बंगल्याकडे जाण्यास निघाले होते. त्यांचा मुक्काम रात्री भांबेरी गावात होता. आज सकाळी ते भांबेरी वरून मुंबईसाठी रवाना होतील असे नियोजन होते. 

      आज पहाटे जालना जिल्हाधिकारी यांनी अंबड तालुक्यात क्रिमिनल प्रोसिजर कोड चे कलम 144 अन्वये जमावबंदी चे आदेश काढले. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे.

       आज सकाळी भांबेरी येथे मनोज जरांगे पाटील यांना समजले की जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 लागू केलेली आहे. कलम 144 चा जनमानसात असा समज आहे की 144 लागू केले म्हणजे संचारबंदी लागू केली. मनोज जरांगे पाटील यांना पण असेच वाटले की जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली आहे. म्हणून त्यांनी मुंबईकडे संचार करण्याचे स्थगित केले आणि सर्व आंदोलकांना सांगितले की संचारबंदी लागू असल्याने सर्वांनी आपापल्या घरी जावे. आणि ते पण अंतरवाली सराटीला परतले.  आणि तिथं आपले आमरण उपोषण सुरू ठेवले.

     आज आमचे प्रतिनिधीनी जालना पोलीस कंट्रोल रूम कडून खात्री केली असता असे सांगण्यात आले की कलम 144 नुसार संचारबंदी लागू केलेली नसून जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे.