उद्या दुपारी जाहीर होणार १० वीचा निकाल :  या अधिकृत वेबसाईटवर पहा ऑनलाईन रिजल्ट...

उद्या दुपारी जाहीर होणार १० वीचा निकाल :  या अधिकृत वेबसाईटवर पहा ऑनलाईन रिजल्ट...

औरंगाबाद, १ जून :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १०वी) परीक्षेचा निकाल उद्या, २ जून रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.

         महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इयत्या १० वी ) परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक ०२/०६/२०२३ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

          माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इयत्ता १०वी) मार्च २०२३ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील अधिकृत संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल.

https://mahresult.nic.in/ या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती पण उपलब्ध होईल.