औरंगाबादचे नामांतराविरुद्ध खा. इम्तियाज जलील यांचे आंदोलन तुर्त स्थगित...
औरंगाबादचे नामांतराविरोधात खासदार इम्तियाज जलील यांनी 14 दिवसांपूर्वी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले धरणे आंदोलन शुक्रवारी (17 मार्च) संध्याकाळी स्थगित केल्याची जाहीर केले.
औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीचे बॅनर खाली मागील 14 दिवसापासून सुरू होते. मात्र त्यामुळे औरंगाबाद शहरातील काही संघटना तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याशिवाय बाहेरील राज्यातून, बाहेरील शहरातून काही वादग्रस्त आणि चिथावणीखोर वक्तव्य करणारी (समाजकंटक) शहरात भाषणासाठी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शहराची शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण झाल्याने तसेच पुढील आठवड्यापासून रमजानचा पवित्र महिना सुरू होत असल्याने तुर्त नामांतर विरोधी आंदोलन स्थगित करण्यात येत आहे. अशी घोषणा खासदार इम्तियाज जलील यांनी पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांची भेट घेतल्यानंतर केली.
सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरू असल्याने लोकसभेत औरंगाबादचे नामांतराबाबत लढाई करणार असल्याचे, तसेच सर्वोच्च न्यायालयात सुद्धा या संदर्भात जाण्याची घोषणा त्यांनी आंदोलन सुरू असलेल्या मंडपात केली.
मागील तीन दिवसापासून लोकसभेची अधिवेशनामुळे खासदार इम्तियाज जलील दिल्लीत होते. शुक्रवारी 17 मार्च रोजी सायंकाळी त्यांनी पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलन स्थळी येऊन आपले भाषणात सांगितले की, आमचे आंदोलन शांतपणे सुरू आहे, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेने ने केलेल्या आंदोलनादरम्यान आमचे बद्दल अपशब्द वापरण्यात आले. काही संघटनांनी दोन दिवसानंतर आंदोलनाची हाक दिली असून त्यात वादग्रस्त व चिथावणीखोर भाषण देणारे ज्यांचे विरुद्ध न्यायालयात शंभरावर खटले दाखल आहेत असे (समाजकंटक) लोकांना शहरात. आणि त्यांचे द्वारे शहराची शांतता भंग प्रकरणाचा प्रयत्न होत आहे.
या सर्व बाबींचा विचार करत खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समिती द्वारा मागील 14 दिवसापासून सुरू असलेली आपले आंदोलन तुर्त स्थगित केल्याची जाहीर केले.