MIM कडून मुख्यमंत्र्यांचे उपहासात्मक स्वागत : खैरे म्हणाले MIM हैद्राबादी रझाकार आहे

MIM कडून मुख्यमंत्र्यांचे उपहासात्मक स्वागत : खैरे म्हणाले MIM हैद्राबादी रझाकार आहे

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहे. मात्र त्यांचा हा दौरा वादळी ठरत आहे. कारण MIM, मनसे, मराठा क्रांती मोर्चा, भाजप या सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवला आहे. MIM खासदार इम्तियाज जलील यांनी उपरोधात्मक स्वागत फलक लावून आंदोलन केले. तर मराठा मोर्चाने आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनसेने विरोध दर्शवण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला.

MIM कडून उपहासात्मक स्वागत

एमआयएमकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उपहासात्मक स्वागत करण्यात आले. बाबा चौक परिसरात एमआयएम कार्यकर्ते एकत्र जमले. हातात स्वागताचे फलक घेऊन कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. बाबा चौक परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. पोलीसांकडून कार्यकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.  औरंगाबाद विमानतळाबाहेरून एमआयएमच्या आंदोलनकर्त्या दोन नगरसेवक आणि पदाधिकऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले.

इम्तियाज जलील काय म्हणाले;

याबाबत खासदार इम्तियाज जलील म्हणाले ” आम्ही आंदोलन करतो आहोत असे कुठेही म्हटले नाही. शिवसेनेने पुस्तक काढून किती विकास केला हे छापले. एकाही पोस्टरवर आम्ही निषेध केला नाही. आम्ही तर फुले घेऊन स्वागतासाठी उभे होतो. तुम्ही काही केले नाही हे तुम्हाला माहिती आहे म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पुस्तकात सेनेच्या महापौरांनी किती कामे केली याचा गाजावाजा केला आहे. मराठवाड्यासाठी एवढे काम तुम्ही केले म्हणून तुमचे स्वागत करण्यासाठी आम्ही आलो आहोत”

निवडणुकांच्या वेळी यायचे आणि हिंदू मुस्लिम करायचे एवढेच त्यांनी केले. जोपर्यंत मराठवाड्याची जनता ठरवणार नाही तोपर्यंत उपयोग नाही. पोलिसांना सांगू इच्छितो, आम्ही आता आंदोलन आणखी तीव्र करणार, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे काय म्हणाले;

दरम्यान शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी MIM आणि मनसेवर हल्लाबोल केला. चंद्रकांत खैरे हे पदाधिकाऱ्यांसह विमानतळावर दाखल होत त्यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केले. खैरे यांनी आंदोलनकर्त्या मनसेला रिकामटेकडे आणि एमआयएमला हैद्राबादी रझाकार म्हटले आहे.

अब्दुल सत्तार काय म्हणाले;

दरम्यान शिवसेना नेते आणि राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही “औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली म्हणून एम आय एम प्रसिद्धीसाठी विरोध करत आहे. येणाऱ्या निवडणुकीत महापालिकेत इम्तियाज़ जलीलांना अपेक्षित यश मिळणार नाही म्हणून हा विरोध चालला आहे."

खालील लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडिओ

MIM कडून मुख्यमंत्र्यांचे औरंगाबादेत उपहासात्मक स्वागत