Bulli Bai Case : बुली बाई केसमध्ये एका महिलेसह तीन समाजकंटकांना अटक

Bulli Bai Case : बुली बाई केसमध्ये एका महिलेसह तीन समाजकंटकांना अटक

मुंबई : (प्रतिनिधी) मुस्लिम महीलांची बदनामी करणाऱ्या बुली-बाई अ‍ॅप प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर पोलीसांनी आतापर्यंत तीन समाजकंटक आरोपींना अटक केली आहे. यातील एक आरोपी बंगळुरु तर इतर दोन आरोपी हे उत्तराखंडचे असल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची मास्टरमाईंड ही एक 18 वर्षीय महीला असल्याचे समोर आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

ही समाजकंटक महिला नेमकी  कोण आहे हे जाणून घेऊ या. (Know Who Is The Master Mind Girl Of Bulli Bai App).

????उत्तराखंड (Uttarakhand) येथून सायबर पोलिसांनी बुली-अ‍ॅप प्रकरणी श्वेता सिंग या 18 वर्षीय समाजकंटक महिलेला अटक केली.

????ती इंजिनिअरिंगच्या परीक्षेचा अभ्यास करत आहे.

????श्वेता सिंगला एक मोठी बहीण, दोन लहान भाऊ आणि लहान बहीण आहे जे शाळेत शिकत आहेत.

????गेल्यावर्षी कोरोनामुळे श्वेता सिंगच्या वडिलांचं निधन झालं. त्याआधी आईचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता.

????प्राथमिक तपासात श्वेता सिंगने सांगितलं की तिला नेपाळमधील व्यक्ती GIYOU आदेश देत होता.

????Giyou हा श्वेता सिंगचा सोशल मीडियावरील मित्र आहे.

????Jattkhalsa07 या ट्विटर हँडलचा वापर श्वेता सिंग करत होती.

याच प्रकरणात सायबर पोलीसांनी उत्तराखंडहून मयांक रावल या 20 वर्षीय समाजकंटकांला नुकतीच अटक केली आहे. हा आरोपी पण उच्च शिक्षित असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे. तर या पूर्वीच पोलीसांनी बंगळुरुहून विशालकुमार झा या 21 वर्षीय समाजकंटक काला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही श्वेता सिंगला सोशल मीडियावर फॉलो करत असल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उत्तराखंडमधील महिलेने आरोपींसोबत ट्विटर आणि सोशल मीडियावर मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित मुली आणि महिलांचे फोटो वापरुन बुली बाई नावाचे अ‍ॅप्लिकेशन विकसित केले होते. या अ‍ॅपवर भेट देणाऱ्यांकडून त्या महिलांवर बोली लावली जात होती. या अ‍ॅपद्वारे 100 मुस्लिम महिलांना लक्ष्य करण्यात आले आहे. यामध्ये अभिनेत्री आणि काही पत्रकारांचीही नावे आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 5 व्टिटर हॅण्डल शोधले आहेत.

बुली-बाई अ‍ॅपला फॉलो करणारे ट्विटर हॅण्डल;

@हरपालसिख खालसा
@सेज@सेज
@खासला सुप्रिमसिस
@जतिंदर सिंग गुल्लर

31 डिसेंबरला आरोपींनी हे अ‍ॅप 'गिट हब'वर अपलोड केलं. याच दिवशी श्वेता सिंगने 'बुली-बाई अ‍ॅप'चे ट्विटर हॅण्डल बनवलं. या अ‍ॅपवरून शिख आणि मुस्लिम समुदयाला एकाच वेळी टार्गेट करण्यात आल्याचं दिसून येत़े. कारण, या बुली-बाई अ‍ॅपला फॉलो करणाऱ्या ट्विटर हॅण्डलची नावं ही शिख समुदायाशी संबंधित ठेवण्यात आली आहे.

याच आरोपींचा सहभाग दिल्लीत नोंदवलेल्या गुन्ह्यात आहे का हे ही तपासले जाणार असून या कटात कोण सहभागी आहेत, त्यांच्या मागे कोण आहे, किती पैसे मिळाले, हे अजून समजलेलं नाही. त्या अनुशंगाने तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिलीये.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेताला विशाल आणि मयांक रावतहे फॉलो करत होते. या तिघांच्या अटकेनंतरही सायबर पोलिसांचा तपास हा थांबलेला नाही. यातील आरोपी विशालला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. तर श्वेता आणि मयांक यांना ट्रान्जिस्ट रिमांडवर मुंबईला आणलं जाणार आहे. अधिक तपास सायबर पोलीस करत असून यात अन्य आरोपींचाही सहभाग असल्याचा संशय सायबर पोलिसांना आहे.