PFI च्या आडून NIA चा वहदते इस्लामीचे कार्यकर्त्यांचे घरावर धाडींचा निषेध : राष्ट्रीय अध्यक्ष ज़ियाउद्दीन सिद्दिकी
औरंगाबाद, 13 ऑक्टोबर : पी एफ आय या प्रतिबंधित संघटनेच्या आडून वहदते इस्लामी या संघटनेच्या कार्यकर्त्यांचे घरावर महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, तमिळनाडूत धाडी टाकून अपमानित करून झडत्या घेण्यात आल्याचे निषेधार्थ आज वहदते इस्लामीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी भरगच्च पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला.
त्यांनी सांगितले की, मागील काही दिवसात एन.आय.ए. या संस्थेने देशातील 20 ठिकाणी धाडी टाकल्या, त्या संस्थेनुसार बंदी घातलेल्या पीएफआय या संघटनेच्या संदर्भात या धाडी टाकण्यात आल्या. एन आय ए ने पी.एफ.आय. च्या नावाखाली "वहदते इस्लामी हिंद" च्या नियतकालीक मासिक "वहदते जदीद' च्या दिल्ली स्थित कार्यालयावरही धाड टाकली. तसेच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तमिळनाडू व राजस्थान मध्ये वहदते इस्लामी हिंद च्या काही कार्यकत्यांच्या घरांची तपासणी करण्यात आली. आणि त्यांना दिवसभर मानसिक दृष्ट्या त्रस्त करण्यात आले.
'वहदते इस्लामी हिंद' ही एक इस्लामी वैचारीक संघटना आहे. ही संघटना इस्लामी तत्वांवर आधारित मानव जीवनाचे निर्माण कार्य करते. या उद्दिष्टांसाठी ही संस्था नियमानुसार व पारदर्शक विविध उपक्रम देशाच्या 16 राज्यात राबवत असते.
वहदते इस्लामी हिंद आपल्या कार्यकर्त्यांना नेहमी न्याय व शांती तसेच निती मुल्यांवर आधारित आचरणांची शिकवण देत असते. म्हणून वहदते इस्लामीच्या कार्यकर्त्यांवर करण्यात आलेल्या सर्व आरोपांचे खंडन करण्यात येत आहे.
जियाउद्दीन सिद्दिकी पुढे म्हणाले, ज्या एफ.आय.आर. च्या आधारावर संपूर्ण भारतात आमच्या संस्थेवर निशाणा साधण्यात येत आहे. त्याच्याशी वहदते इस्लामी हिंदचा काहीही संबंध नाही. सरकारला जर असे वाटत असेल की ते अशा प्रयत्नांनी वहदते इसलामी हिंद ला हतोत्साहित करू शकणार तर हा गैरसमज आहे.
आम्ही आमची बाजू नेहमी स्वच्छ व स्पष्ट शब्दांत मांडत असतो. तसेच आम्ही नेहमी सकारात्मक पणे विचार करीत आलो आहोत, तथापी मागिल काही दिवसांच्या घटनांनी नाइलाजास्तव या निष्कर्षापर्यंत यावे लागते की आमच्या संघटनेला बेकायदेशीर ठरवणयासाठी वातावरण निर्मिती व पार्श्वभूमी तयार करण्याचा प्रयत्न होत आहे.
आम्ही नेहमी स्पष्टीकरण देतो की पी. एफ. आय. व वहदते इस्लामी हिंद या वेगवेगळ्या संस्था आहेत. दोन्हींचे वेगवेगळे कार्य आहे. तरी पी.एफ.आय. च्या नावाखाली आमच्या कार्यकत्यांच्या घरांची झडती का घेण्यात येत आहे? बरं, या झडतीत सापडले काय? तर, "वहदते जदीद" या नियतकालीकाचे अंक, इस्लामी साहित्य, धार्मिक व अध्यात्मिक ग्रंथ, काही दैनिक वृत्तपत्रे व त्यांची कात्रणे तसेच काही आवश्यक कागदपत्रे! हे सर्व आपत्तीजनक आहेत काय? ज्यांच्या आधारावर त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. उलट प्रत्येकवेळी आमच्या कार्यकत्य्यांनी तपासयंत्रणेच्या तपासकार्यात जास्तीत जास्त सहकार्यच केलेले आहे.
आम्ही आजच्या परिस्थितित, दैनंदिन जीवनातील, मान सम्मान, संपत्ती व प्राणांवर विविध मार्गांनी होत असलेल्या हल्यांमुळे संघर्षशील आहोत. त्याबरोबर तपास यंत्रणांच्या या कारवायांमुळे त्रासात भर पडत आहे. तथापी यामुळे आमच्या नितिधैर्याचे खच्चीकरण होणार नाही, उलट त्यात वाढच होणार आहे.
आम्ही सर्वच तपासयंत्रणांना स्पष्ट करू इच्छितो की वहदते इस्लामी हिंद आपल्या तपास कार्यात नेहमी सहयोग करेल. मात्र अपमान व बदनामी सहन केली जाऊ शकत नाही. हे मानवी मुल्यां बरहुकुम अवांछनिय आहे.
वरील सर्व विवेचानाच्या संदर्भात आम्ही आमचा तिव्र विरोध जाहिर करीत आहोत. सर्व संबंधितांनी यावर कृपया लक्ष द्यावे. असे सांगितले.
या पत्रकार परिषदेत वहदते इस्लामीचे राष्ट्रीय अध्यक्ष ज़ियाउद्दीन सिद्दिकी यांचे सह मसरुर खान, शेख मुन्तजिबुद्दीन यांची उपस्थिती होती.