धक्कादायक! ATS च्या कारवाईत 162 जिवंत बॉम्ब सापडले : आरोपीविरुद्ध UAPAct ऐवजी किरकोळ कलमा !!
रत्नागिरी : (प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील शिवधामापूर येथे मध्य प्रदेशातील एका व्यक्तीला जिल्हा दहशतवाद विरोधी पथकआणि बॉम्ब नाशक पथकाने जेरबंद केलं आहे. या व्यक्तीकडून तब्बल 162 जिवंत गावठी बॉम्ब हस्तगत करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत.
जिल्ह्यात मागील दीड महिन्यात गावठी बॉम्ब मोठ्या प्रमाणात सापडल्याची ही तिसरी घटना उघड झाली आहे. यापूर्वी मंडणगड तालुक्यात 19 गावठी बॉम्ब सापडले होते. तसेच दोन घटना या संगमेश्वर तालुक्यातील समोर आल्या होत्या.
जिल्हा दहशतवाद विरोधी पथक व बॉम्ब नाशक पथकाला संगमेश्वर तालुक्यातील शिवधामापूर येथे गावठी बॉम्ब घेऊन एक व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली होती. गुरुवारी दहशतवाद विरोधी पथकाने तातडीने या भागात सापळा रचला होता. शिवधामापूर गावच्या हद्दीत जंगल परिसरात असणाऱ्या एका बंद घराशेजारी संशयित व्यक्ती आल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पथकातील कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याचे जवळील बॉक्स मध्ये 162 गावठी बॉम्ब मिळून आले. चौकशीमध्ये ही व्यक्ती मध्यप्रदेशातील राहणारी असून त्याने आपले नाव आबस उर्फ कल्लू कथालाल बहेलिया असल्याचे सांगितले.
दहशतवाद विरोधी पथकाने याची माहिती वरिष्ठ अधिकारी व संगमेश्वर पोलीस स्थानकाला दिली. पोलीस स्टेशन संगमेश्वर येथे आरोपी विरुद्ध सन 1908 चा भारताचा बारी पदार्थ कायदा (Explosive Substances Act) कलम 5 सह भारतीय दंडविधान आचे कलम 286 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐरवी असे पदार्थ एखाद्या मुसलमानाकडे मिळून आल्यास त्याचे विरुद्ध आतंकवाद विरोधी कायदा म्हणजेच अनलॉफुल एक्टिवितीज प्रेवेंशन एक्ट (UAPAct) नुसार गुन्हे दाखल करण्यात येतात. परंतु 162 जीवंत बॉम्ब सापडूनही आरोपी विरुद्ध किरकोळ कलमा लावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.