अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार सह मराठवाड्यातील तीन सदस्य हज कमिटीवर, मात्र औरंगाबाद हज हाऊस उदघाटनाच्या प्रतीक्षेत : ८ ऑगस्टच्या मीटिंगमध्ये तरी उद्घाटनाचा निर्णय होणार का?

औरंगाबाद, २५ जुलै : अत्याधुनिक सर्व सोयीसुविधा युक्त असे औरंगाबाद हज हाऊस पूर्ण तयार झालेले आहे. कोविड काळापासून हज यात्रेकरूंसाठी औरंगाबाद एम्बार्केशन पॉईंट बंद करण्यात आला होता. यावर्षी पासून औरंगाबाद एम्बार्केशन पॉईंट सुरू करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्य हज कमिटी कडून आश्वासन देण्यात आले होते की सन २०२३ चे हाजयात्रेकरूंना हजसाठी जाण्यापूर्वी औरंगाबाद हाऊस उपलब्ध करून देण्यात येईल. परंतु हज हाऊसशी संबंधित अल्पसंख्यांक विकास विभागासह अनेक खाती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे असल्याने हज हाऊस चे उदघाटनाचा विषय त्यांच्या प्राधान्यक्रमात नव्हता. त्यामुळे सन २०२३ चे हजचा सीजन निघून गेला. परंतु अद्यापही औरंगाबाद हज हाऊस उदघाटनाच्या प्रतीक्षेतच आहे.
नुकतेच अल्पसंख्यांक विकास विभागाचा पदभार औरंगाबाद जिल्ह्यातील तडफदार मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अब्दुल सत्तार यांनी पदभार स्वीकारताच महाराष्ट्र राज्य हज कमिटीची मीटिंग ८ ऑगस्त २०२३ रोजी मुंबई येथे आयोजित करण्याचे फर्मान सोडले. त्यानुसार मुंबई येथील साबू सिद्दिक मुसाफीर खाना येथे दिनांक ८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११:३० महाराष्ट्र राज्य हज कमिटीची मीटिंग घेण्यात येणार असल्याची सूचना सर्व सदस्यांना देण्यात आली आहे. या मीटिंगमध्ये औरंगाबाद हज हाऊस चे उदघाटनाबाबत चर्चा होणार का? उदघाटनाची तारीख निश्चित होणार का? याकडे मराठवाड्यातील सर्व इच्छुक हजयात्रेकरूंचे लक्ष लागलेले आहे.
महाराष्ट्र राज्य हज कमिटी वरील खालील नमूद सदस्यांना सूचना देणारे पत्र अल्पसंख्यांक विकास विभागाचे कक्ष अधिकारी जुनेद सय्यद यांचे सहीने पाठविण्यात आले आहे.
(१) मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार,
(२) अध्यक्ष, आरिफ उसमान खान,
(३) वक्फ बोर्ड अध्यक्ष तथा आमदार डॉ. वजाहत मिर्झा.
(४) श्रीमती नसिमा शैख
(५) एजाज देशमुख
(६) अशरफ अली
(७) मोहम्मद शकील काझी
(८) अफज़ल शब्बर अली दावूदानी
(९) इराफ़ान शेख
(१०) शेख फ़िरोजलाला
(११) सलीम बागवान
(१२) काझी आरीफ़उल्ला
(१३) शेख इव्राहिम
१४) इ.म. काझी, कार्यकारी अधिकारी