तहफ्फुज़े औकाफ कॉन्फरन्स ला समाजवादी पार्टीचा पाठिंबा : आ. अबू आसिम आझमी

औरंगाबाद २४ मे : शहरात २५ मे २०२५ रोजी, रविवारला आमखास मैदानात "ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड" तर्फे “वक्फ बचाओ, संविधान बचाओ” या मथळ्याखाली “तहफ्फुज़े औकाफ कॉन्फरन्स” होणार आहे.
या कॉन्फरन्सला महाराष्ट्र प्रदेश समाजवादी पार्टीच्या वतीने संपूर्ण पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. त्याबाबतचे पत्र महाराष्ट्र प्रदेश समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आमदार अबू असीम आझमी यांनी दिले आहे. ते पत्र आज महाराष्ट्र प्रदेश समाजवादी पार्टीचे महासचिव शेख अब्दुल रऊफ, प्रदेश सचिव आयुब खान, रियाजुद्दीन देशमुख आणि शेख युनूस उर्फ बाबा लीडर यांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल ला बोर्ड चे सदस्य मौलाना मेहफूज़ुर रहमान फारुक़ी, तहफ्फुज़े औक़ाफ कमिटीचे कन्वेनर मौलाना मुफ्ती मोईज़ यांचे स्वाधीन केले.
विशेष म्हणजे समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव आणि पक्षाचे सर्व खासदार व आमदार यांनी वक्फ विधेयकाचा संसद आणि विधानसभेत तीव्र विरोध केला आहे.