UP इलेक्शनच्या तोंडावर आतंकवादी घातपाताचा कट उघड : महाराष्ट्रातील एकासह 6 आतंकवादी अटक
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भारतात आतंकवादी घातपात घडवण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांनी उधळला असून महाराष्ट्रातील का सह एकूण सहा आतंकवाद्यांना अटक केली आहे.
अटक केलेल्या या सहा आतंकवाद्यांची पुढे येणाऱ्या सणासुदीची मध्ये देशात आतंकवादी घातपात घडवून आणण्याची योजना होती. अशी माहिती पोलिसांनी दिली. अटक केलेल्या या आतंकवाद्यांना पैकी दोघेजण पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन आल्याची माहिती पण पोलिसांनी दिली.
दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या पोलीसांना आतंखवाद्या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर या सर्व राज्याने समन्वयाने ही कारवाई केली. ही कारवाई एकाच वेळी विविध ठिकाणी करण्यात आली. दिल्ली पोलीसांच्या विशेष शाखेचे वरिष्ठ अधिकारी नीरज ठाकूर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
"महाराष्ट्रातील एका दहशतवाद्याला राजस्थानच्या कोटा येथे टाकलेल्या छाप्यात अटक केली आहे. या दहशतवाद्यांना उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने तीन जणांना अटक केली. तर इतर दोन जणांना दिल्लीतून अटक केली."
अटक केलेल्या व्यक्तीची नावे; मोहम्मद शेख, ओसामा, मूलचंद, जीशान कमर, मोहम्मद अबू बकर आणि मोहम्मद अली जावेद अशी आहेत.
पोलिसांनी त्यांच्याकडून दोन ग्रेनेड, दोन आयईडी स्फोटक, एक किलो आरडीएक्स आणि एक इटालियन पिस्तूल देखील जप्त केले आहे.
दिल्ली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी ओसामा मस्कत गेला होता. पुढे बोटीने पाकिस्तानला गेला होता.
पोलीस अधिकारी नीरज ठाकूर यांनी सांगितले की, या लोकांना पाकिस्तानातील एका फार्म हाऊसमध्ये 15 दिवस ठेवण्यात आले आणि त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
दिल्ली पोलीसांच्या विशेष शाखेला एका केंद्रीय एजन्सीकडून, पाकिस्तानमध्ये प्रशिक्षित काही दहशतवाद्यांना भारतात उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट घडवायचे होते.