Ather Energy च्या 'रिझ्ता इलेक्ट्रिक स्कूटर" ची जातीवादी जाहिरात: महाराष्ट्राच्या मनात खळबळ

आज, 21 जून 2025 रोजी, महाराष्ट्रातील काही प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर Ather Energy च्या रिझ्ता इलेक्ट्रिक स्कूटरची जाहिरात झळकली. "एक लाख इंडियन फॅमिलीजला रिझ्टा मंजूर" असा दावा करणारी ही जाहिरात पाहिल्यावर कोणाच्याही मनात प्रश्न निर्माण होतो की, ही "इंडियन फॅमिलीज" म्हणजे नेमक्या कोणत्या कुटुंबांचा उल्लेख आहे? कारण, या जाहिरातीत महाराष्ट्रातील काही विशिष्ट आडनावांचाच समावेश आहे, तर इतर समुदायांना – विशेषतः शेड्युल्ड कास्ट (SC), शेड्युल्ड ट्राइब (ST) आणि मुस्लिम समाजातील आडनावांना – पूर्णपणे डावलण्यात आलं आहे. ही जाहिरात म्हणजे फक्त एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे की, Ather Energy च्या जातीय भेदभावाच्या मानसिकतेचा पुरावा? हा प्रश्न आता प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे.
या जाहिरातीत शिंदे, पाटील, जाधव, राणे, बावणे, माटे, वराडे, साळुंके, गुरव, मिशीकर, परुडेकर, ठाकरे, साळस्कर, जोशी, शेलार, पवार, केसरकर, चव्हाण, मोरे, गावंडे, कदम, कुलकर्णी, देशपांडे, देशमुख, देसाई, गाडेकर, फळतडे, नवले, वाघ, भंडारे, पिंगळे, मांजरेकर, तेंडुलकर यासारख्या आडनावांचा उल्लेख आहे. या सर्व आडनावांना "रिझ्ता" उपसर्ग लावून, "रिझ्ता पाटील", "रिझ्ता जोशी", "रिझ्ता ठाकरे" अशा प्रकारे त्यांचा गौरव केला आहे. पण याच जाहिरातीत गवई, डोंगरे, अंभोरे, दाभाडे, हुमणे, शिरसाट, वाघमारे, गायकवाड, मेश्राम, शेख, खान, सय्यद, गावित, वसावी, टेटरिया, पारधी, मडावी, भिलारे, पठाण यासारख्या SC, ST आणि मुस्लिम समाजातील प्रचलित आडनावांचा उल्लेख का नाही? हा निव्वळ योगायोग आहे की, Ather Energy ची जातीयवादी मानसिकता यातून दिसते?
Ather Energy ही बेंगलुरूस्थित कंपनी, ज्याचे सह-संस्थापक तरुण मेहता आणि स्वप्नील जैन आहेत, नेहमीच "आधुनिक तंत्रज्ञान" आणि "टिकाऊ भविष्य" यांचा टेंभा मिरवते. पण ही जाहिरात पाहिल्यावर असं वाटतं की, त्यांचं "टिकाऊ भविष्य" फक्त काही निवडक जाती आणि समुदायांपुरतंच मर्यादित आहे. महाराष्ट्रातील शिरूर कास्ट ट्राइब आणि मुस्लिम समाजाला या जाहिरातीतून स्पष्टपणे वगळण्यात आलं आहे. याचा अर्थ काय? Ather Energy ला या समुदायांची खरेदीशक्ती नको आहे? की त्यांना या समुदायांना त्यांच्या स्कूटरच्या "लायक" समजायचं नाही? असा भेदभाव करणारी ही कंपनी खरंच "आधुनिक" आहे का?
महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित असणारा प्रदेश आहे. इथे सर्वधर्मसमभाव आणि समता ही मूल्यं रुजलेली आहेत. पण Ather Energy ची ही जाहिरात जातीय भेदभाव आणि सामाजिक बहिष्कार यांचं उघड उदाहरण आहे. SC/ST आणि मुस्लिम समाजातील आडनावांचा उल्लेख टाळून, कंपनीने केवळ उच्चवर्णीय आणि विशिष्ट जातींनाच लक्ष्य केलं आहे. यातून असा संदेश जातो की, "रिझ्टा फक्त काही मर्यादित जातींसाठीच आहे." असा जातीवादी संदेश देणारी कंपनी महाराष्ट्राच्या मातीशी कशी जुळणार?
Ather Energy चे मालक, तरुण मेहता आणि स्वप्नील जैन, यांनी या जाहिरातीला परवानगी देऊन आपली सामाजिक जबाबदारी झटकली आहे. IIT मधून शिकलेले हे दोघेही "आधुनिक भारत" चे प्रतिनिधी असल्याचा दावा करतात. पण त्यांच्या कंपनीच्या या जाहिरातीतून त्यांची जातीयवादी मानसिकता उघड झाली आहे. जर त्यांना खरंच सर्वसमावेशक भारताची निर्मिती करायची असेल, तर त्यांनी सर्व समाजांना – विशेषतः SC, ST आणि मुस्लिमांना – का वगळलं? याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावं. नाहीतर, ही जाहिरात त्यांच्या जातीयवादी आणि भेदभावपूर्ण धोरणांचा पुरावा ठरेल.
महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती , SC/ST आणि मुस्लिम बांधवांनी या जाहिरातीचा निषेध करायला हवा. Ather Energy च्या रिझ्ता स्कूटरला खरेदी करणं म्हणजे या कंपनीच्या जातीयवादी धोरणांना पाठिंबा देण्यासारखं आहे. आपण सर्वांनी मिळून असा संदेश द्यायला हवा की, महाराष्ट्रात भेदभावाला थारा नाही. ज्या कंपन्या सर्व समाजांना समान लेखत नाहीत, त्यांना इथे स्थान नाही. TVS iQube, Bajaj Chetak किंवा Ola S1 सारख्या स्कूटर्स उपलब्ध असताना, रिझ्ता का खरेदी करायची?
Ather Energy ची रिझ्ता स्कूटरची जाहिरात ही केवळ एक मार्केटिंग चूक नाही, तर जातीय भेदभावाचा स्पष्ट पुरावा आहे. तरुण मेहता आणि स्वप्नील जैन यांनी या जाहिरातीतून महाराष्ट्रातील SC, ST आणि मुस्लिम समाजाचा अपमान केला आहे. ही कंपनी आपल्या जातीयवादी धोरणांमुळे महाराष्ट्राच्या जनतेकडून बहिष्काराला सामोरी जाईल, यात शंका नाही. महाराष्ट्र जागा आहे, आणि जातीवादाला थारा देणार नाही!
-डॉ. रियाज़ देशमुख, एसीपी (रि), छत्रपती संभाजीनगर. 8888836498