घाटीतील सुपर स्पेशिलिटी बिल्डींग लावणीचा कार्यक्रम घेण्यासाठी बनविली का ? : खा. इम्तियाज़ जलील

घाटीतील सुपर स्पेशिलिटी बिल्डींग लावणीचा कार्यक्रम घेण्यासाठी बनविली का ? : खा. इम्तियाज़ जलील

          घाटीत गोरगरीब रुग्णांना उच्च दर्जाची वैद्यकिय सेवा वेळेवर मिळावी यासाठी शासनाकडून कोट्यावधी रुपये खर्चून सर्व सोयीसुविधायुक्त अद्यावत सुपर स्पेशिलिटी बिल्डींगचे बांधकाम करण्यात आलेले आहे. तसेच विविध शस्त्रक्रिया व उपचार करण्यासाठी आधुनिक वैद्यकिय यंत्रसामुग्री सुध्दा बसविण्यात आलेली आहे. परंतु आजपर्यंत डॉक्टर्स व वैद्यकिय कर्मचार्‍यांची भरती न केल्याने कोट्यावधीची बिल्डींग व यंत्रसामुग्री धुळखात पडलेली आहे. सुपर स्पेशिलिटी बिल्डींगमध्ये डॉक्टर्स, वैद्यकिय कर्मचार्‍यांची पदभरती होवून रुग्णांचे उपचार होणार आहे किंवा त्याठिकाणी लावणीचा कार्यक्रम घेण्यासाठी कोट्यावधीचा खर्च करण्यात आला आहे ? अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.