वो तलवार लेके आयेंगे, तो हम उनका फुल से स्वागत करेंगे!
अमरावती : राज्याच्या राजकारणात सत्ताधारी सरकार मधले दोन गटाचे समर्थीत आमदारांचा वाद मात्र मिटायला तयार नाही आहे.एका मागून एक प्रश्न उत्तर व प्रति प्रश्नाचा खेळ राज्याच्या राजकारणात रंगत चालला आहे. मात्र त्यामुळे राज्यातील राजकारनात हे दोन नेते वैक्तिगत राजकारणाला मात्र राज्याचा मुद्दा बनवत. माध्यमात चर्चेत राहण्याचा प्रयत्नात आहे. मात्र राज्याच्या मोठ्या दोन नेत्यांच्या मध्यस्थी नंतर हा वाद संपुष्टात आला असं सगळीकडे वाटत असले तरी ही फक्त चिंगारी असून पुढे खूप काही बाकी आहे. आज माध्यमाशी बोलतांना भाजपा समर्थीत अपक्ष आमदार राणा म्हणाले, कोणी जर मला दम देत असेल, तर रवी राणा नी उद्धव ठाकरे चा दम खालला नाही. बच्चू कडू तर काहीच नाही. जर दम देऊन बोलत असेल जशास तस उत्तर देणार. कुठल्याही स्तरावर देणार असं राणा म्हणाले.. ह्या नंतर पुन्हा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ह्यांच्या मध्यस्थी पडल्यानंतरचा वाद पुन्हा शिगेला पोहोचल्याचे चित्र रानाच्या वक्तव्यानंतर उभे झाले होते. मात्र शिंदे गटाचे समर्थीत अपक्ष आमदार बच्चू कडू ह्यांनी आमदार रानांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत म्हणाले.. मी काल भाषणात बोललो त्यात कुठे राणाचा उल्लेख केला का..? भाषणातून मी केवळ इशारा दिला होता जर माझ्या वाटेला गेले तर कोथळा काढल्या शिवाय राहणार नाही. रवी राणानी स्वतःला लावून घेण्याची काही गरज नाही.आणि मला शांतता ठेवायची आहे. विकासकामाचा पाठपुरावा करायचा आहे. तसेच मला भरपूर काम सुद्धा आहे. त्यांची इच्छा असेल तर मी पाच सहा तारखेला घरीच आहे. त्याने यावं आम्ही त्याचे स्वागत करू.. वो तलवार लेके आयेंगे, तो हम उनका फुल से स्वागत करेंगे अशा शब्दात बच्चू कडू म्हणाले.त्याला इच्छा असेल तर मी तयार आहे.. या संपूर्ण घटनेबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ह्यांच्या सोबत मी देखील बोलणार आहोत. त्यांच्या मध्यस्थी भूमिकेनंतर मी शांत झालो होतो. तरी सुद्धा त्यांची इच्छा असेल "मेरी मर्दागी मुझे बताना हैं" तर मी निशस्त्र.. त्यांनी तलवार घेऊन यावं मी फुल घेऊन येणार अशा शब्दात आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू ह्यांनी राणाच्या वक्तव्याला प्रति उत्तर दिले.
(साभार 3km)