शेख ज़फर कैसर यांना पत्रकारीता क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर

शेख ज़फर कैसर यांना पत्रकारीता क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर

औरंगाबाद :  सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारिता क्षेत्रातील शेख जफर यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.हा पुरस्कार सोहळा दि. ३०-१२-२०२१ गुरुवार रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे.

माणुसकी समुहाच्या पाचव्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा- सकाळी १०:०० वाजता महारक्तदान शिबीर शासकीय रत्त पेढि साठि- ०१:०० वा. मान्यवरांच्या हस्ते सेवा गौरव  पुरस्कार वितरण सोहळा समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३१ व्यक्तीचां गुण गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्यापैकी औरंगाबाद रहिवासी दैनिक भास्कर वरिष्ठ पत्रकार  शेख जफर यांनी दैनिक भास्कर दैनिकाच्या माध्यमातून औरंगाबाद परिसरात पत्रकारीतेतून सामाजिक दायित्व अंगिकारून ,शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, व आरोग्य क्षेत्रातील प्रश्ननांना वाचा फोडून उल्लेखनीय कार्य केल्याचे दिसून येत आहे.

शेख जफर यांनी औरंगाबाद येथील हाँर्निम काँलेज आँफ जर्नालिझम अँण्ड माँस कम्युनिकेशन (आजाद कॉलेज ) येथे  पदव्युत्तर पत्रकारितेचे शिक्षण घेऊन  औरंगाबाद येथील दैनिक औरंगाबाद सिटीजन, दैनिक शम ए रहबर, दैनिक शासन सम्राट या  दैनिकात पत्रकार म्हणुन सुरवात केली आहे. या नंतर मी मराठी , लाईव इंडिया, जिया न्युज  मुंबई येथील न्युज चैनल मध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे   वरिष्ठ पत्रकार म्हणून  जबाबदारी पार पाडली. सध्या ते भारताचे लोकप्रिय दैनिक भास्कर औरंगाबाद येथे 11  वर्षांपासून पत्रकारिता करीत आहे. पत्रकारिता करताना कोणत्याही प्रलोभनां बळी न पडता निर्भिड पत्रकारिता करणारे पत्रकार म्हणून औरंगाबाद सह परीसरात व प्रशासनात एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. प्रत्येक घटनेचा मागोवा, पाठपुरावा  व अभ्यास करून प्रश्नांना वाचा फोडणारे पत्रकार आहेत.

विशेष कामगिरी

औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात सेवा सुविधां बरोबरच वैद्यकीय अधिकार्यांच्या नियुक्त्या विषयी लिखाण करून रुग्णालयात रुग्ण सेवा सुस्थितीत आणली. जिल्हा प्रशासन व पुलिस विभागामध्ये चाललेल्या भाेंगळ कारभाराला वाचा फोडली. औरंगाबाद येथील समाज सेवक सुमित पंडित यांच्या सहपरीवाराची कोरोना काळात उपचारासाठी फरफट यावर लिखाण प्रकाशित. औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाविषयी वाचा फोडली, खरीपावर काळ्या बाजाराचे सावट, जल संकट, बनावट नोटा प्रकरण उघडकीस आणले, शेतीत नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवून शाश्वत विकास साधणाऱ्या शेतकऱ्यांविषयी असे अनेक प्रकरण समोर आणले. यावर प्रशासनाला कार्रवाई करावी लागली.

माणुसकी समुहाचा सेवा गौरव पुरस्कार निवड झाल्या बाबत पत्राद्वारे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यांनी कळविले आहे. ह्या पुरस्काराबद्दल  शेख जफर यांचे समाजामध्ये सर्वेत्र कौतुक केले जात आहे.