औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर : आंदोलनाचा इशारा देताच देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन - खा. इम्तियाज़ जलील
औरंगाबाद, २८ फेब्रुवारी : औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याबाबत राज्य सरकारला केंद्र सरकारने संमती दिल्यानंतर मी लगेच औरंगाबादेत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देताच मला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. त्यांनी G-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर आंदोलन न करण्यासाठी विनंती केली. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि पोलीस आयुक्त यांनी ही मला विनंती केली की G-20 परिषदेचा या दोन दिवसात तुम्ही काही आंदोलन करू नका. मी करणार होतो आणि करू शकलो असतो परंतु मी औरंगाबादचा नागरिक आहे. मला आयुष्यभर इथे राहायचे आहे. म्हणून मी तसे काही केले नाही. असे विधान त्यांनी त्यांची दिल्ली गेट जवळील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
पुढे ते म्हणाले की 27 मार्च 2023 पूर्वी आम्ही औरंगाबाद शहराचे नामांतराविरुद्ध मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत.
खासदार इतिहासातील यांनी शासनाला आव्हान केले की तुम्हाला शहराचे नावच बदलायचे असेल तर मुंबईचे नाव श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर, नागपूरचे नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, कोल्हापूरचे नाव छत्रपती शाहू महाराज नगर, पुण्याचे नाव महात्मा फुले नगर करावे.