वक्फ बोर्ड कडून आता आमखासवर फुटबॉल सोबत इनडोअर स्टेडियम : १४३ वक्फ संस्था ताब्यात घेणार

वक्फ बोर्ड कडून आता आमखासवर फुटबॉल सोबत इनडोअर स्टेडियम : १४३ वक्फ संस्था ताब्यात घेणार

छत्रपती संभाजी नगर, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या वतीने मराठवाड्यातील दोन शहरात स्टेडियम होणार आहे.छत्रपती संभाजी नगरच्या आमखास मैदान सोबतच बीडला ही स्टेडियम होणार असल्याची महत्वपूर्ण माहिती एका पत्रकार परिषदेत वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर गुलाम नबी काझी यांनी दिली.केंद्र व राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक मंत्रालयात कडून चारशे कोटींचा संयुक्त निधी उपलब्ध करून देण्यात येणारआहे.आमखास मैदानावर फुटबॉल स्टेडियम बरोबर इनडोअर स्टेडियम ही होणार आहे,राज्यातील १४३ संस्था ताब्यात घेण्यात येणार आहे तर भाडेकरूंना भाडेकरार न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल,अशी महत्वाची माहिती ही त्यांनी या वेळी दिली-

४०० कोटींचा निधीचे नियोजन
             राज्य वक्फ बोर्डा कडून शहराच्या आमखास मैदानावर दर्जेदार स्टेडियम व्हावे या साठी राज्य शासनाला कडे १०९ कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी व मुख्यकार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद यांनी या साठी विशेष पाठपुरावा केला.आता समीर काझी यांनी पुन्हा वाढीव निधी साठी केंद्रीय अल्पसंख्यांकमंत्री किरण रिजिजू व राज्य अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी प्राथमिक चर्चा केली.यावर दोघांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.अध्यक्ष समीर काझी यांनी राज्यात वक्फ बोर्ड अंतर्गत आणखी एक स्टेडियम व्हावा म्हणून मागणी केली असता चर्चेत निधी साठी नियोजन करण्याचे आश्वासन देण्यात आले. आमखास मैदानावर फुटबॉल स्टेडियम सोबत इतर खेळा साठी इनडोअर स्टेडियम व्हावा,म्हणून केंद्र व राज्य सरकार निधी उपलब्ध करून देणार असल्याचे अध्यक्ष काझी यांनी सांगितले.बोर्डाच्या बैठकीत अधिकृतरित्या मंजुरी देण्यात आली.आता बोर्डा कडून लवकरच मान्यस्तव प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

- १४३ संस्थांना ताब्यात घेऊन विकास करणार
-             राज्यातील तब्बल १४३ वक्फ संस्थांना घेत बोर्डा कडून ताब्यात घेऊन त्यांचा विकास करण्याचा प्रस्ताव ही बैठकीत करण्यात आला.या संस्थेत वादविवाद व तक्रारी असल्याने त्यांच्या कडून वक्फ फंड वसूल करण्यात अडचण होत होती.तसेच विकास न झाल्याने त्याचा सर्वसामान्यांना फायदा होत नव्हता.आता बोर्ड संस्थांना थेट ताब्यात घेऊन देखरेख करणार आहे.शक्य तो विकास करून वाढीव वक्फ फंड वसूल होईल अशी अपेक्षाही अध्यक्ष काझी यांनी व्यक्त केली.
-

भाडेकरार न करणाऱ्यांना आता कायदेशीर धडा कारवा
         महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळा अंतर्गत तब्बल एक लाख एकदा पैकी ओसाहत टक्के जमिनीवर अतिक्रमण आहे.ज्या संस्थांच्या अंतर्गत जमिनि, व्यवसायिक प्रतिष्ठाने ते केंद्रीय कायदा २०१४ नियमा प्रमाणे भाडेकरार करत नाहीं. बोर्ड अश्या कब्जा करणाऱ्या जमीन व प्रतिष्ठानने यांच्या भोगवटादारांना नोटिसा पाठवणार आहे.भाडेकरार न करणाऱ्या विरोधात कलम ५२ व ५४ ची कारवाई राबविण्यात येणार आहे.

- - मॉडेल स्कीम योजना राबविणार
- राज्यातील संस्थांच्या अनेक स्कीम व फेरबदल सध्या प्रलंबित आहेत.या प्रकरणाचा लवकर निपटारा व्हावा म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणीच वक्फ अधिकाऱ्यांनी पडताळणी करून प्रस्ताव मुख्यालयात पाठविण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.येत्या दोन महिन्या सर्व योजना प्रकरणांचा निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.गतिमान प्रशासन व्हावे यासाठी निर्णय घेण्यात आल्याचे माहिती अध्यक्ष काझी यांनी दिली.


- - येत्या वर्षी वीस कोटींचे लक्ष्य
-           २०२४-२५ साली वक्फ बोर्डाचा निधी दहा कोटींचा जमा झाला आहे.पूर्वी तो फक्त सहा कोटी होता.आता अंतर्गत लेख परीक्षण विभागाला २०२५-२६ साली वीस कोटींचा निधी जमा करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे.निधीत वाढ झाल्याने बोर्डा कडून राज्यातील गोरगरिबांना शैक्षणिक स्कॉलरशिप,आरोग्य व इतर जनहितार्थ कामे कामे।करण्यात येणार आहे.


         रोजंदारी कर्मचाऱ्यांना २०० रुपय वाढीव पगार, दर महिन्याला बैठक तसेच दर महिन्याच्या शेवटच्या
-  गुरुवारी सुनावणी व शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.बैठकी साठी आता अध्यक्ष व सदस्यांची मंजुरीची गरज राहणार नाही.गरजू लोकांना सोयीस्कर व्हावे या संताजी बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.,असल्याची माहिती अध्यक्ष काझी यांनी दिली.


     बैठकीत वरिष्ठ सदस्य मौलाना अथर अली, ऍड.ए.यु.पठाण, ऍड.इफतेखार हाश्मी, मुख्यकार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद, उपमुख्य कार्यकरी अधिकारी मुशीर शेख, विशेष अधीक्षक खुसरो खान यांची उपस्थिती होती.