हत्याराचा धाक, अब्रूची भीती आणि १० वर्षांची लूट!; सनातनी हमालाचा महिलेवर अमानुष अत्याचार
नवी मुंबई : शहराला हादरवून सोडणारी संतापजनक घटना नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट परिसरातून समोर आली आहे. हमालीचे काम करणाऱ्या एका नराधमाने ५५ वर्षीय महिलेला हत्याराचा धाक दाखवत तब्बल दहा वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एवढ्यावरच न थांबता पीडितेकडून रोख, बँक व्यवहार आणि ऑनलाईन ट्रान्स्फरद्वारे तब्बल २० लाख रुपये उकळल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
खारघर पोलिसांनी सनातनी आरोपी रमेश (वय ३६) याला अटक केली असून, त्याच्याविरोधात बलात्कार, खंडणी, धमकी आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वास संपादन करून रचला सैतानी डाव
पीडित महिला खारघर परिसरात आपल्या मुलासह एकटी राहत होती. २०१३ साली तिची ओळख एपीएमसी मार्केटमध्ये हमाली करणाऱ्या आरोपीशी झाली. महिलेची परिस्थिती आणि एकटेपणा ओळखून आरोपीने आधी तिचा विश्वास जिंकला. मात्र, नंतर याच विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने सैतानी डाव रचला.
कटर गळ्याला लावून धमकी
आरोपीने पीडित महिला आणि तिच्या मुलाच्या गळ्याला कटर लावून जीवे मारण्याची धमकी दिली. या भीतीच्या छायेत त्याने महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीची विकृती इतकी वाढली की त्याने वारंवार महिलेला धमकावत तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवले.
नग्न फोटो-व्हिडिओ व्हायरलची धमकी
पीडित महिलेचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपी देत होता. अब्रूच्या भीतीने आणि मुलाच्या सुरक्षेसाठी महिला गप्प राहिली. याच भीतीचा फायदा घेत आरोपीने तिला वेळोवेळी पैशांसाठी ब्लॅकमेल केले.
रोख, बँक ट्रान्स्फर, फोन-पेने २० लाखांची उकळपट्टी
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेकडून रोख रक्कम, बँक ट्रान्स्फर आणि ‘फोन-पे’द्वारे मिळून तब्बल २० लाख रुपये उकळले. एका सामान्य महिलेला मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या पोखरण्याचे हे घृणास्पद कारस्थान तब्बल दशकभर सुरू होते.
त्रासाला कंटाळून पोलिसांकडे धाव
आरोपीच्या वाढत्या छळाला कंटाळून अखेर पीडित महिलेने खारघर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
नवी मुंबईसारख्या विकसित शहरात एका महिलेला दहा वर्षे धमकी, अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगला सामोरे जावे लागते, ही बाब गंभीर आहे. अशा नराधमांना कडकात कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.