भारतीय लोकशाहीतील विभूतीपूजा लोकशाहीसाठी घातक

भारतीय लोकशाहीतील विभूतीपूजा लोकशाहीसाठी घातक

"एखादा मनुष्य कितीही मोठा असला तरी त्याच्या चरणी आपले स्वातंत्र्य अर्पू नका. अगर त्याजवर इतका विश्वास टाकू नका की, त्यामुळे तो लोकशाही संस्थांचे स्वरूप बदलून टाकेल."
    ----- जॉन स्टुअर्ट  मील ( तत्वज्ञ लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते ) 

   " लोकशाहीतील विभूतीपूजा लोकशाहीला घातक असते."
"येथील धर्मातही मूर्तीपूजा आहे आणि राजकारणातही व्यक्तीपूजा आहे. विभूतीपूजा ही भक्तांना नितिभ्रष्ट करते, म्हणून देशाला मारक आहे. तुम्ही ज्याची पूजा करणार आहात, तो खरोखरच मोठा आहे की नाही हे तपासून पहा. हे काम सोपे नाही. सध्याच्या काळात  वर्तमानपत्रे हातात बाळगून " थोर पुरुष " घडवणे हे फारच मामुली काम झाले आहे. कारण विभूतीपूजा स्वतंत्र विचार करण्याची प्रक्रिया मारून टाकते. यामुळे देशात विचारांची रोपटी विभूतीपूजेच्या वृक्षाखाली वाढत नाहीत. "
 --- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

     ????  वरील लोकशाही सिद्धांत्तानुसार आमची भारतीय लोकशाही मूळ लोकशाहीपासून कोसो मैल दूर गेली...........
     याला जबाबदार कोण............?????
    "  याला जबाबदार येथील खोटा बुद्धीजीवी वर्ग. याला जबाबदार येथील जातीय आणि धार्मिक अहंकार.......

       यातून कोणताही राजकीय पक्ष सुटलेला नाही.  प्रत्येक लहान/ मोठ्या,  सत्ताधारी / विरोधी, राजकीय पक्षात व्यक्तीपूजा / विभूतीपूजा  ठासून भरलेली आहे. प्रत्येक कार्यकर्ता नेता होण्यासाठी तडफडत असतो. तोच कार्यकर्ता पुढे स्वतःचं विभूतीपूजेचं वर्तुळ तयार करून पक्षांतर्गत आणि देशांतर्गत लोकशाही लोप पावून एकाधिकारशाहीचा जन्म होतो.

     अगदी महापुरुषांच्याबाबतीत सुद्धा व्यक्तीपूजा/ विभूतीपूजा लोकशाहीला घातक ठरते. परंतू  *महापुरुषांच्या विचाराची पूजा* लोकशाहीला पोषक ठरते.

    अशा प्रकारच्या  लोकशाही सिद्धांतानुसार आपल्या आजच्या 2026 मधल्या भारतीय लोकशाहीतील राजकीय विभूतीपूजेच्या बाबतीत निर्माण झालेल्या बिकट अवस्थेची चिकित्सक तुलना जर केली, तर आमची लोकशाही केवळ 2 % जिवंत आहे. हेच सिद्ध होईल......!

      कारण, भाजप हा आज एकमेव पक्ष असा आहे की त्याने राजकीय विभूतीपूजेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांच्याकडे तर *वॉशिंग मशीन* आहे. त्याच्यामागून इतर सर्वच राजकीय पक्षांनी सुद्धा कमी अधिक प्रमाणात याच मार्गाचा अवलंब केल्याने आमच्या देशातील *लोकशाहीतील विभूतीपूजा* अतिउच्चं टोकाला जाऊन पोहोचली आहे. 

    म्हणून आम्ही भारताच्या लोकांची ही अवस्था आहे. भारताच्या संविधानाने आम्हाला देशाचे आणि व्यवस्थेचे मालक बनविले. परंतू , 4000 वर्षांपासून मानसिक गुलामीची सवय झालेल्या गुलामांना भारतीय संविधानाची शक्तीच ओळखता आली नाही. यातून  स्वतःला विद्वान, प्राध्यापक, डॉक्टर्स, सुशिक्षित समजणारे सुद्धा सुटू शकले नाहीत. यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान केवळ आम्हांलाच समजलाय, आम्ही जसे बोलू, जसे वागू, तोच आंबेडकरवाद अज्ञानी समाजावर लादण्याचे आजवर काम केल्याने लोकशाहीची आणि संविधानाची पर्यायाने देशाची व जनतेची ही अवस्था झालेली आहे.

       या सर्वांवर एकच उपाय आहे. तो म्हणजे *भारताच्या संविधानावर* सत्ताधारी राजकीय पक्षाला आणि संपूर्ण ब्युरोक्रॅसीला 100% देश चालवण्यास भाग पाडणे. त्यासाठीच सर्व सामाजिक संघटनानी आणि विशेषता आम्ही भारताच्या लोकांनी परिणामकारक प्रयत्न करणे अत्यावशक आहे.

  आवाहनकर्ता :- अनंत केरबाजी भवरे ( संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689)