अ‍ॅड. डॉ. नवाब पटेल लिखित कायद्याचे सहा पुस्तकाचे प्रकाशन

अ‍ॅड. डॉ. नवाब पटेल लिखित कायद्याचे सहा पुस्तकाचे प्रकाशन

संभाजी नगर, २५ जुलै :  आज  बैतुल यतीम सभागृह, येथे महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे नवनिर्वाचीत सदस्य अ‍ॅड. वसंतराव सांळुखे यांच्या अध्यक्षते खाली एका भव्य कार्यक्रमात अ‍ॅड. नवाब पटेल यांनी लिहिलेल्या परिवार न्यायालय, कानून बराए क़जात, परिवारीक विवाद एवं समाधान, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, मुस्लिम वारस हक्क कायदा आणि कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा या सहा पुस्तकाचे प्रकाशन महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या उपस्थीतीत संपन्न झाले, 

      या प्रसंगी कार्यक्रमांत हसीन अख्तर, अध्यक्ष महाराष्ट्र उर्दू साहित्य अकादमी, जेष्ठ विधीज्ञ टी. के. प्रभाकरण, सर्वोच्च न्यायालयाचे वकील एस. एस. काजी, माजी महापौर तथा नगरसेवक रशिद मामू, कन्नडच्या नगराध्यक्षा फरहीन बेगम जावीद शेठ, माजी नगरसेवक मोहसीन अहेमद या मान्यवरांची उपस्थीतीती होती.

     या प्रसंगी अ‍ॅड. वसंतराव सांळुखे यांची महाराष्ट्र गोवा दमन दिव व नगर हवेली या ५ राज्याच्या एका मतदार संघात ५ व्या वेळी ते निवडून आले, म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच अब्दुल रशिद खान मामू, कन्नड च्या नवविर्चारित अध्यक्षा फरहीन बेगम, न्यायअधीकारी गोरखनाथ मल्हार हे लिपीक ते न्यायधिश पर्यंत नियुक्त होण्याचा मान मिळविला म्हणून त्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच जहीर अब्बास शहा यांनी वैद्यकीय व्यवसायात देशभरासाठी ख्याती प्राप्त केली, मोहसिन अहेमद यांना महाराष्ट्र उर्दू अकादमी तर्फे विशेष पुरस्कार प्रदान केल्यामुळे आणि सोहेल अजहर खान यांनी निट परीक्षेत ७२०/६२८ गुण प्राप्त केले, तसेच नोमानी शारेका अन्वर पिता नजमोद्दीन यांनी देखील नीट परीक्षेत प्राविण्य मिळविले म्हणून त्यांचा व ज्या विद्यार्थी विद्यार्थींनी १० वी आणि १२वी परीक्षेत चांगले गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले त्यांचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला तसेच आवेस पठाण यांची न्यायालयीन अधिक्षक पदावर पदोन्नती झाली म्हणून या सर्वांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. 
 
     मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी आपल्या भाषणात नमुद केले की, अ‍ॅड. डॉ. नवाब पटेल यांनी उर्दू, मराठी, हिंदी या तिन्ही भाषेत इंग्रजी भाषेतील कायद्याच्या पुस्तकाचे लिखान करून सर्व सामान्य जनतेला कायद्याची माहिती व्हावी, यासाठी मोलाची कामगिरी केली, म्हणून त्याचे करावे तितके अभिनंदन कमी पडेल. हे फार कठीण काम असून त्यांनी दैनंदिन वकील व्यवसाय सांभाळून हे काम केले, म्हणून ही बाब कौतुकास्पद आहे. 

     तसेच हसीन अख्तर, अध्यक्ष महाराष्ट्र उर्दू अकादमी यांनी नमुद केले की, उर्दूतील पुस्तके वाचक वर्ग कमी खरेदी करतो, म्हणून लेखक अशी पुस्तके लिहण्या साठी आणि प्रकाशक प्रकाशित करण्यासाठी मागे हटतात, तरी देखील हे आव्हान स्विकारून अ‍ॅड. डॉ. नवाब पटेल यांनी स्वखर्चाने हे काम केले व सर्व सामान्य जनतेला कायद्याची माहिती व्हावी यासाठी मोलाची कामगिरी केली, म्हणून मी महाराष्ट्र उर्दू अकादमीचा अध्यक्ष या नात्याने जाहीर करतो की, त्यांची काही पुस्तके उर्दू अकादमीसाठी आम्ही खरेदी करू जेने करून त्यांनी केलेल्या मोलाच्या कामगिरीमध्ये आम्ही खारीचा वाटा जरूर घेऊ असे नमुद केले.

       तर रशिद मामु यांनी अ‍ॅड. डॉ. नवाब पटेल यांच्या १९७४-७५ साली झालेल्या मराठवाडा विकास अंदोलनापासून आजपर्यंतच्या प्रवासाची संपुर्ण माहिती उपस्थितीतांसमोर ठेवून जी माहिती सर्वसामान्य जनतेला नव्हती ती उपलब्ध करून दिली व मीच नवाब पटेल यांना उर्दू भाषेत महानगरपालिका कायद्याचे पुस्तक लिहिण्यासाठी विनंती केली होती, कारण नवनिर्वाचित नगरसेवाकांना देखील महानगरपालिका कायद्याची माहिती नसल्याने दैनंदिन कामात त्यांनाही अडचण निर्माण होते, ती अडचण दुर होऊ शकेल आणि निश्चितच त्यांनी ते काम करून दाखविले.

     या प्रसंगी कन्नडच्या नवनिर्वाचीत अध्यक्षा फरहीन बेगम यांनी देखील आपले विचार मांडतांना अ‍ॅड. डॉ. नवाब पटेल यांचा कन्नड पासून औरंगाबाद पर्यंतचा विकासाचा इतिहासच उपस्थितासमोर ठेवले व नवाब पटेल यांनी लिहिलेल्या पुर्वीच्या २६ पुस्तकाची आणि आताच्या ६ पुस्तकाची माहिती जनतेसमोर ठेवली. मोहसिन पहेलवान यांनी देखील आपले विचार मांडत अ‍ॅड. डॉ. नवाब पटेल यांच्या कार्याचा लेखा जोखा उपस्थितासमोर ठेवले, अशा पद्धतीने वरिल मान्यवरांनी अ‍ॅड. नवाब पटेल यांच्या कायद्याची पुस्तके लिखान करण्याच्या कार्या बाबत कौतुक करून वयाच्या ७३ व्या वर्षी देखील अ‍ॅड. डॉ. नवाब पटेल यांनी आपले लिखान काम शिक्षण घेण्याचे काम आणि दैनंदिन न्यायालयीन काम करण्या बाबत उपस्थितीता समोर माहिती ठेवून सर्वांनी अ‍ॅड. डॉ. नवाब पटेल यांचाही सत्कार केले. 

     याप्रसंगी या कामात त्यांना डी.टी.पी.चे कार्य करणार्‍या त्यांचे सहकारी राजीव चौतमल आणि हा कार्यक्रम सादर करण्यासाठी त्यांना सहकार्य करणारे काजी अब्दुल वाजीद, फेरोज खान, सना नाजमीन यांचा देखील सत्कार करण्यात आला.

      याप्रसंगी मजलीस दारुल क़जा व शरई खिदमातचे कौटुंबिक समुपदेशक काजी अब्दुल वाजीद यांनी असे जाहीर केले की, त्यांच्या पत्नी स्वर्गीय नाहीद फारुकी यांच्या नावाने नाहीद फारुकी शिष्यवृत्ती प्रत्येक वर्षी ५ विद्यार्थ्यांना देण्यात येईल व आजही त्यांनी शिष्यवृत्तीच्या रुपाने ५ विद्यार्थी व विद्यार्थींनीना त्यांच्या तर्फे शिष्यवृत्ती दिली. 

     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापक जाकेरोद्दीन यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन अ‍ॅड. शेख सज्जाद अहेमद (जकी शेख) यांनी केले. या कार्यक्रमात जवळपास २०० महिला पुरुषांची उपस्थिती होती.