महानगरपालिकेच्या वेबसाईटचा आणि स्मार्ट सिटी ॲपचा खेळखंडोबा
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) महानगरपालिकेच्या वेबसाईटचा आणि स्मार्ट सिटी अंतर्गत बनविलेल्या मोबाईल ॲपचा खेळखंडोबा...
https://aurangabadmahapalika.org, https://chhsambhajinagarmc.org आणि https://aurangabadsmartcity.in या वेबसाइट्सवर असलेली जुनी (अद्ययावत नसलेली) माहिती, नियोजन व परिणाम शून्य मोबाईल ॲप्स अश्या चुकांचा पसारा मांडून काम करणाऱ्या संबंधितांना वेळोवेळी सप्रमाण माहिती देऊनही या समस्यांचे निराकरण करण्याऐवजी उघडपणे दुर्लक्ष करण्याचे धोरण जबाबदार अधिकारी/कर्मचारी वर्गाने स्वीकारल्याचे दिसते.
म्हणजेच "स्मार्ट नागरिक" किंवा "जल बेल" अश्या मोबाईल ॲप्स, ह्यापैकी "स्मार्ट नागरिक" ही ॲप गुगल प्ले च्या सामान्य सुरक्षा नियांमंन पूरक ठरत नाही, म्हणून अस्वीकृत केले गेले. तर "जल बेल" ही मोबाईल ॲप करत असलेले शहरातील पाणीपुरवठा नियोजनाचे वेळापत्रक, इत्यादी दावे फोल ठरतात. किंबहुना ही ॲपदेखील वर्तमान अँड्रॉइड प्रणालिकरिता नव्हे तर जुन्या प्रणालीला पूरक आहे असे गुगल प्ले जाहीर करतो.
महानगरपालिकेच्या दोन्ही वेबसाइट्स काही दिवसांपूर्वी असुकक्षित होत्या आणि ते सामान्य स्थितीत आणायला अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त वेळ स्मार्ट सिटीच्या अति स्मार्ट कर्मचारी व अधिकारी यांना लागला.
तक्रारींबाबत प्रमाण दर्शविणाऱ्या वेब लिंक्स :
http://youtube.com/post/UgkxjhSZ_5Ctz-88-6bsg1Vb1xfr7VoxHSQn?feature=shared
http://youtube.com/post/UgkxVGxR06bdzP11pFFyPReups3jViECcDrC?feature=shared
http://youtube.com/post/UgkxjRaXNw7YuoT6ZnkqhkAQ3vvXflXKqggI?feature=shared
http://youtube.com/post/UgkxbGkoC58lAxffVw1QzF6T1QHiVi1yUxQ4?feature=shared
याबाबतची संपूर्ण माहिती मागील वर्षभरापासून महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, विभागीय आयुक्त यांना पाठवूनही अजूनही समस्यांचे निराकरणच काय तर दाखल घेणे प्रलंबित आहे.
थोडक्यात कर तर जनतेच्या संपत्तीचे अर्थात सार्वजनिक साधनसंपत्तीची उघडपणे लयलूट करून परिणामशून्य किंवा चुकीचे परिणाम/निष्कर्ष देणाऱ्या वेबसाइट्स व मोबाईल ॲप्स चा बाजार मांडण्यात आला आहे. यांशी संबंधित त्रुटी, चुका आदींची तक्रार देऊन पाठपुरावा केला तरीही त्यात काडीमात्र सुधारणा हित नाही, कारण हे सारे सार्वजनिक साधनसंपत्तीतून साकारले जाते आणि जब विचारणारा कोणीच नाही या भ्रमात सारे काही बिनधास्तपणे चालू आहे.
- इकबाल सईद काझी, (विश्लेषक/लेखक/कवी)