मला पहा अन फुलं वहा : जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीतील कालबाह्य.....

मला पहा अन फुलं वहा : जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीतील कालबाह्य.....

औरंगाबाद, दि. २२ मार्च : औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील सिटीसर्व्हे विभागात चे रेकॉर्ड रूमला सन २०१९ चे जून महिन्यात आग लागली होती. ती आग विझविण्यासाठी कार्यालयातील कालबाह्य अग्निशमन यंत्रांचा वापर करण्यात आला होता. परंतु या यंत्रांचा वापर केल्यानंतरही आग आटोक्यात न आल्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. तेव्हा आग आटोक्यात आली होती.

          या घटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयाने कोणताच धडा घेतल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे. तसं तर जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रत्येक माळावर अनेक अग्निशमन यंत्रे लावलेली दिसून येतात. परंतु ह्या अग्निशमन यंत्रांचे बारकाईने निरीक्षण केले असता, ही यंत्रे फक्त शोभेसाठी ठेवल्याचे निष्पन्न होत आहे. कारण ही अग्निशमन यंत्रे कालबाह्य झालेली आहेत.येथे क्लिक करून पहा व्हिडिओ : मला पहा आणि फुले वाहा...

           अग्निशमन यंत्रांची प्रत्येक वर्षी रिपेअरिंग करणे गरजेचे असते. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अग्निशमन यंत्रे कालबाह्य झालेली आहेत. त्यांची रिफिलिंग केलेली नाही. दरवर्षी वर्षातून दोन वेळा सरकारी इमारतींचे फायर ऑडिट करून घेणे हे कार्यालय प्रमुखाची तसेच महानगरपालिका किंवा नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे कर्तव्य आहे. परंतु आज च्या घडीला ही कालबाह्य अग्निशमन यंत्रे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवर दिसत असल्याने बहुतेक त्यांचे फायर ऑडिट झालेले नसावे असे वाटते. ही कालबाह्य अग्निशमन यंत्रे तात्काळ अद्यावत करावी. अशी अपेक्षा केली जात आहे. कालबाह्य अग्निशमन यंत्रे कार्यालयात ठेवण्यात कोण कोण जबाबदार आहे?त्यांचे वर कारवाई सुद्धा अपेक्षित आहे.