शिवसेनेचे राजू वैद्य यांचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'

शिवसेनेचे राजू वैद्य यांचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे छत्रपती संभाजीनगर महानगर प्रमुख रेणुकादास उर्फ राजू वैद्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे अधिकृत पत्र त्यांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठवले आहे.

         राजीनाम्याच्या पत्रात राजू वैद्य यांनी उद्धव ठाकरे यांना सप्रेम ‘जय महाराष्ट्र’ करत, वैयक्तिक कारणांमुळे आपण पक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. तसेच आतापर्यंत पक्षाने व शिवसैनिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत.

        या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या असून, रेणुकादास उर्फ राजू वैद्य हे आगामी काळात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

        दरम्यान, राजू वैद्य यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्का मानला जात आहे.